सैनिक हो.. तुमच्यासाठी

 Bhandup
 सैनिक हो.. तुमच्यासाठी
 सैनिक हो.. तुमच्यासाठी
 सैनिक हो.. तुमच्यासाठी
 सैनिक हो.. तुमच्यासाठी
 सैनिक हो.. तुमच्यासाठी
See all

भांडुप - देशाच्या सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी भांडुप पश्चिमेकडील विकास मंडळ, साई विहार सार्वजनिक गणेश मंडळानं त्यांना दिवाळीचा फराळ पाठवला आहे. या मंडळानं यापूर्वी अनाथाश्रम, आदिवासी पाडे, वृद्धाश्रम यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आहे.

सैनिकासाठी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय मंडळाकडून गणेशोत्सवानंतर घेण्यात आला होता. त्यानुसार मुंबईतून संरक्षण खात्यात नियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं काश्मीरमध्ये सीमेवर असलेल्या सैनिक, अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. सोमवारी सायंकाळी स्पीड पोस्टनं हा फराळ सैनिकांना पाठवण्यात आला. सैन्यातील लेफ्टनंट कर्नल मनिषकुमार यांनी या प्रेमामुळं आपण भारावून गेलो, असा संदेश पाठवल्याचं मंडळाचे सचिव अमोद करंजे यांनी सांगितलं.

Loading Comments