उत्तम आरोग्य, निरोगी जीवन - लीना मोगरे

मुंबई - धावपळीच्या, दगदगीच्या जीवशैलीमुळे प्रत्येकाच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत आहे. यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणजे नियमित व्यायाम, पण या व्यस्त जीवनशैलीमुळे मुंबईसारख्या शहरात अनेकांना या व्यायामासाठीही वेळ मिळत नाही. पण अशावेळी कोणत्या विशिष्ट वेळेतच व्यायाम करायला हवा, असे नाही तर कधीही आणि कोणत्याही वयात व्यायाम करता येतो असे सांगताहेत फिटनेस ट्रेनर लीना मोगरे. यामुळेच त्यांची एक जिम २४ तास चालू असते. मोगरे यांचं म्हणणं आहे की, जे तरुण-तरुणी कॉल सेंटरमध्ये काम करतात किंवा जे खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी मी रात्रभर जिम सुरू ठेवली आहे. नियमित व्यायाम केल्यास, उत्तम आरोग्य लाभते असेही लीना मोगरे यांनी सांगितले.

Loading Comments