वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...

मुलुंड - वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. या अभंगातून तुकोबांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भारतीय संस्कृतीत आयुर्वेदात किंवा अगदी घरगुती वापरातही वनस्पतीचे महत्त्वाचे स्थान आहे. याच संकल्पेनवर आधारीत रविवारी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृह परिसरात हरियाली संस्था आणि मुंबई महानगरपालिका टी विभागातर्फे औषधी वनस्पतींचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तसंच या औषधी वनस्पतींचा वापर कशाप्रकारे करावा यासाठी कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आलं. गेली वीस वर्ष वृक्ष संवर्धनासाठी झटणाऱ्या हरियाली या संस्थेतर्फे हे सहावे प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात एकूण 160 विविध प्रकारच्या औषधी वनस्पती ठेवण्यात आल्या. तसंच या औषधी वनस्पतींची माहिती देणारी पुस्तिका देखील प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्या लोकांना उपलब्ध करून देण्यात आली. अनेक औषधी वनस्पती आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. वेळीच त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने योग्य पावले उचलायला हवीत असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

Loading Comments