तबेल्यातून थेट ग्राहकाकडे

जोगेश्वरी - मुंबई उपनगरातील जोगेश्वरीमध्ये तबेला आहे. या तबेल्यातून मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होते. या तबेल्यामध्ये सुमारे एक हजार म्हशी आहेत. त्यांची देखभाल तसेच दूध काढण्यासाठी सुमारे 20 ते 25 कामगार आहेत. या कामगारांचा दिनक्रम पहाटे चार वाजल्यापासून सुरू होतो. हे कामगार म्हशीचं सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळा दूध काढतात. हे दूध प्रामुख्यानं पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये विक्रीसाठी पाठविले जाते. एक म्हैस दिवसाला अंदाजे 6 लीटर दूध देते. विशेष म्हणजे म्हशींच्या कानांमध्ये नंबर प्लेट लावली जाते. जेणेकरून त्यांची गणना करणे सोपे होते. म्हशींना उन्हाळ्यामध्ये दिवसातून दोन वेळा तर हिवाळ्यामध्ये एक वेळा धुतलं जातं.

Loading Comments