Advertisement

गोव्याला कशाला जाताय राव? मुंबईच्या बीचवरच लुटा वॉटर स्पोर्ट्सचा थरार !

वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटण्यासाठी तारकर्ली वा गोव्याला जायची गरज नाही. हो, आता ही मजा तुम्हाला मुंबईतच, मुंबईच्या बीचवर लुटता येणार आहे आणि ती ही लवकरच, अगदी फेब्रुवारी २०१८ पासून!

गोव्याला कशाला जाताय राव? मुंबईच्या बीचवरच लुटा वॉटर स्पोर्ट्सचा थरार !
SHARES

गोवा असो वा तारकर्ली, इथला देखणा निर्सग, बीच, पर्यटकांना भुरळ घालतातच! पण त्यातही तारकर्ली आणि गोव्याच्या बीचवरचा वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवण्यासाठी तिथं जाणाऱ्या मुंबईकर पर्यटकांची संख्या मोठीच म्हणावी लागेल. पण, मुंबईकरांनो, वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटण्यासाठी तुम्हाला आता तारकर्ली वा गोव्याला जायची गरज नाही. हो, कारण ही मजा तुम्हाला मुंबईतच, मुंबईच्या बीचवर लुटता येणार आहे आणि तीही लवकरच, अगदी फेब्रुवारी २०१८ पासून!काय आहे धोरण?

मुंबईकर, पर्यटकांना मुंबईच्या बीचवर वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवता यावा, यासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने तारकर्ली-गोव्याच्या धर्तीवर मुंबईच्या बीचवरही वॉटर स्पोर्ट्सची सेवा सुरू करण्याचा निर्णय सागरी महामंडळाने घेतल्याची माहिती महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पटणी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.कुठे सुरू होणार?

गिरगाव, वर्सोवा, जुहू, मार्वे, वसई जेट्टी, भाईंदर अशा बीचवर वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात येणार असून यासाठी महामंडळाने वॉटर स्पोर्ट्स सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. या अर्जांची छाननी करत पात्र कंपन्यांना बीचवर वॉटर स्पोर्ट्स सेवा कार्यान्वित करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. जिथे जिथे मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टीवर ही सेवा राबवणं व्यवहार्य ठरेल, तिथं परवानगी दिली जाईल.अर्जाची मुदत काय?

दरम्यान १५ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. तर प्रत्यक्षात वॉटर स्पोर्ट्स फेब्रुवारी २०१८ पासून सुरू होईल, असंही पटणी यांनी सांगितलं. ५ वर्षांसाठी ही परवानगी देण्यात येणार असून सेवा कार्यान्वित करण्यासह सर्व जबाबदारी कंपन्यांची असणार आहे. तर सुरक्षेच्या योग्य त्या उपाययोजनाही कंपन्यांनीच करणं बंधनकारक आहे.


कुठले स्पोर्ट्स असतील?

फेब्रवारी २०१८ पासून वॉटर स्पोर्ट्स सुरू झाल्यास मुंबईकरांना आणि पर्यटकांना पॅरासिलिंग, स्पीड बोट, बनाना बोट राईड, जेट स्की अशा वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवता येणार आहे. त्यामुळे यापुढे गिरगाव, जुहू, वर्सोवा बीचवर पर्यटकांची गर्दी वाढलेली नक्कीच पाहायला मिळेल!हेही वाचा

केरळच्या हाऊसबोटची मजा अनुभवा आता मुंबईत!


Read this story in English
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा