‘नि:शब्द’ करणारं अन्नस्थळ

पवई - मुंबई हे सतत गजबजलेले शहर, या शहरात शांतता मिळणे तसे दुर्मिळच. अगदी पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत कधीही पाहिलं तरी मुंबई आपल्याला शांत पाहायला मिळणार नाही. पण, मुंबईत असं एक ठिकाण आहे जिथे शांतता बोलते आणि ते आहे ' मिर्ची आणि माईम 'हे हॉटेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे हॉटेल असून शांत कसं, त्याचं कारणंही तसंच आहे. 'मिर्ची आणि माईम ' या रेस्टॉरंटचा सर्व स्टाफ हा मूकबधिर आहे. मुंबईतल्या पवईत हे हॉटेल आहे. प्रशांत इसार यांनी ही असामान्य गोष्ट करून दाखवली आहे. इथे आल्यावर तुम्हाला या स्टाफशी बोलायला कसलीही अडचण होणार नाही, याची पुरेपूर काळजीही घेतली आहे. प्रत्येक टेबलवर तुम्हाला साइन लँग्वेजचा चार्ट असतो, ज्या चार्टमुळे तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधणं सोपं जात. तर, अशा स्टाफला आपल्या हॉटेलमध्ये कामाला ठेवणं ही गोष्ट खरंतर तेवढी सोपी नव्हती. त्यासाठी हॉटेलच्या टीमला खूप मेहनत घ्यावी लागल्याचं हॉटेल मालक प्रशांत इसार यांनी सांगितलं.

Loading Comments