सोनु तुझे आरजे पे भरोसा नही क्या?

  Mumbai
  सोनु तुझे आरजे पे भरोसा नही क्या?
  मुंबई  -  

  मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय का? या विडंबनात्मक गाण्यानं आरजे मलिष्का आता घराघरात पोहोचली आहे. घराघरात म्हण्यापेक्षा तिनं सध्या मुंबईकरांच्या मनात घर केलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण तिनं मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा मुद्दा उचलून धरला. मुंबई पालिकेच्या कारभाराची पोलखोल तिनं सोनू साँगच्या माध्यमातून केली. पण ही पोलखोल शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली. शिवसेनेनंही 'सोनु'चाच आधार घेत मलिष्काला जशास तसं उत्तर दिलं. शिवसेनेने कितीही आरडाओरड केली तरी मुंबईकर मात्र मलिष्काच्या पाठिशी उभे राहिले. यासाठी तिनं मुंबईकरांचे आभार देखील मानले.


  मलिष्काला पाठिंबा म्हणून आता मुंबईकरांसोबतच दिल्लीतील रेड एफएमची टीम देखील पुढे सरसावली आहे. आरजे रौनकनं मलिष्काला पाठिंबा म्हणून नवीन गाणं तयार केलं आहे. 

  सोनु तुझे आरजे पे भरोसा नहीं क्या?

  आरजे की बात लगे जोक जोक

  आरजे को बोलने से मत रोक

  सोनु तुझे आरजे पे भरोसा नही क्या?

  आरजे रौनकचं हे गाणं सध्या चांगलंच गाजत आहे. रौनक आणि त्याच्या टीमनं चक्क रस्त्यावर साचलेल्या पाण्यात राफ्ट बोटीवर स्वार होऊन हे गाणं गायलंय.

  एवढंच नाही, तर मलिष्का मुंबईवर आधारीत अजून सहा गाणी घेऊन येणार आहे. त्यामुळे आता या गाण्यांमधून कोणाची पोलखोल होणार आहे, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. 


  एकप्रकारे 'सोनु'वरून सध्या शिवसेना आणि मलिष्कामध्ये चांगलंच घमासान सुरू आहे. रेडिओवर बडबड करून अनेकांचे मनोरंजन करणारी मलिष्का तिच्या आणि शिवसेनेतील 'तु-तु, मै-मै' मुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
  हेही वाचा

  बीएमसीवरच्या 'भरोसा'ला सोशल साईट्सवर तडा!

  डेंग्यूच्या अळ्या, राजकारण आणि आरजे मलिष्काचा इशारा!


   डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.