Advertisement

ABS सह रॉयल एन्फिल्ड बाजारात, पहा किती आहे किंमत

बुलेट हे नाव माहीत नसलेली व्यक्ती क्वचितच सापडेल. तरूणांमध्ये म्हटलं तर बुलेटची क्रेझ फार आहे. इतर बाईकसारखं एका महिन्यात भरभरून बाईक्स बाजारात आणणाऱ्या कंपन्यांमध्ये बुलेट नक्कीच नाही.

ABS सह रॉयल एन्फिल्ड बाजारात, पहा किती आहे किंमत
SHARES

बुलेट हे नाव माहीत नसलेली व्यक्ती क्वचितच सापडेल. तरूणांमध्ये म्हटलं तर बुलेटची क्रेझ फार आहे. इतर बाईकसारखं एका महिन्यात भरभरून बाईक्स बाजारात आणणाऱ्या कंपन्यांमध्ये बुलेट नक्कीच नाही. सध्या रॉयल एन्फिल्डनं सिंगल चॅनल ABS आणि रिअर लिफ्ट प्रोटेक्शनसह बुलेट ३५० आणि ३५० ES भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रानं इंजिन डिस्प्लेसमेंटनुसार टू व्हिलर्समध्ये CBS (कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम) किंवा ABS (एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) कंपन्यांनी देणं अनिवार्य केलं आहे. १ एप्रिलपासून हे बाजारात येणाऱ्या टू व्हिलर्सना ही अट लागू होणार आहे. त्यानुसारच कंपनीनं या टू व्हिलर्स बाजारात आणल्या आहेत.


नव्या बदलानंतर कंपनीनं बुलेट ३५० च्या ३ हजार ५०० तर बुलेट ES च्या किंमतीत १ हजार ४०० रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बुलेटच्या येणाऱ्या सर्व टू व्हिलर्समध्ये आता ABS मिळणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार १२५ सीसी पेक्षा अधिक इंजिन असलेल्या टू व्हिलर्समध्ये ABS आणि १२५ सीसी पेक्षा कमी इंजिन असलेल्या टू-व्हिलर्समध्ये CBS देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.


रॉयल एन्फिल्ड बुलेट 350 आणि 350 ES मध्ये ३४६ सीसी, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल इंजिन देण्यात आलं आहे. यापूर्वीच्याही गाड्यांमध्ये कंपनीनं हेच इंजिन दिलं होतं. त्यामुळं इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. सध्या या गाड्यांमध्ये ड्युअल चॅनल ABS ऐवजी सिंगल चॅनल ABS वापरण्यात आलं आहे. त्यामुळं गाड्यांच्या किंमतीत जास्त वाढ झालेली नाही. जर या गाड्यांच्या आगामी मॉडलमध्ये ड्युअल चॅनल ABS दिल्यास गाड्यांची किंमत १० हजारांपेक्षा जास्त वाढू शकते. सध्या भारतीय बाजारात ABS रॉयल एन्फिल्ड बुलेट 350 ची किंमत १.२१ लाख तर 350 ES ची किंमत १.३५ लाखांच्या घरात आहे.




हेही वाचा -

आता शूजही अल्ट्रा‘स्मार्ट’

आधार कार्ड हरवलंय? नॉट टू वरी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा