Advertisement

धारावीत 'माणुसकीची भिंत' संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद


धारावीत 'माणुसकीची भिंत' संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
SHARES

धारावी - कलानगर द्रुतगती मार्गावर रविवारी ‘माणुसकीची भिंत’ या नव्या संकल्पनेतून स्ट्रीट स्टोर्स उभारण्यात आले. या अनोख्या संकल्पनेतून आयडीबीआय फेडरल इनशॉरन्स आणि लिओ क्लबच्या वतीने शेकडो गरीब गरजूंना मोफत कपडे, बुट, चप्पल मदत म्हणून देण्यात आली. या अनोख्या ‘स्ट्रीट स्टोर्स’चा लाभ घेण्यासाठी गरजूंची गर्दी उसळली होती. लिओ क्लबचे अनेक स्वयंसेवक गरीब गरजूशी प्रेमाने संवाद साधून त्यांना दोन जोड पसंतीचे कपडे आणि चप्पल किंवा बूट देत होते. या वेळी चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर पसंतीचे कपडे, चपला मिळाल्याचा आनंद झळकत होता. 

‘माणुसकीची भिंत’ यावर आधारित ‘स्ट्रीट स्टोर्स’ही संकल्पना सर्वत्र लोकप्रिय होणार आहे. यावर आधारलेली ही भिंत गरीब, गरजू आणि मध्यमवर्गीय सर्वांसाठीच आकर्षक ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील्या अनेक ऑफिस तसेच कार्यालयात जुने कपडे, बूट, चप्पल गरीब गरजूंसाठी देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. या करीता लिओ क्लबच्या स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली होती.






"या आवाहनात कोणावरही स्वच्छ कपडे आणून देण्याचे बंधन टाकण्यात आले नाही. मळलेले कपडे, चप्पल, बूट स्वीकारले जातील असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आमच्या आवाहनाला मुबंईकरांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो जोड लहानमुलांचे तसेच महिला, पुरुषांचे कपडे, चप्पल बूट जमा झाले. सदरील सर्व कपडे एकत्र करून लॉड्रित धुवून इस्त्री करण्यात आले. तसेच फाटलेले कपडे रफू करून ‘स्ट्रीट स्टोर्स’च्या भिंतीवर टांगण्यात आले आहे. हा आमचा पहिला प्रयोग असून प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबईसह इतर भागात ही संकल्पना राबवण्याचा मानस आहे,"

   - कार्तिक रमण, चीफ मार्केटिंग ऑफिसर, आयडीबीआय फेडरल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा