लीना मोगरे यांचा फिटनेस मंत्र

मुंबई - प्रत्येक व्यक्तीला आपलं शरीर पिळदार असावं असं वाटतं. आपणही सेलिब्रेटींसारखं दिसावं आणि त्यांच्यासारखे सिक्सपैक्स आपलेही असावे असं प्रत्येकाला वाटत. काहींना लवकर असं शरीर कमवावं असं वाटत. पण हे शक्य आहे का? देशातली पहिल्या सेलेब्रेटी फिटनेस ट्रेनर लीना मोगरे सांगताहेत यातली वास्तविकता काय आहे आणि त्यासाठी कशाप्रकारे योग्य आहार घेऊन पिळदार शरीर कमावता येतं ते. लीना मोगरे शिस्तबद्ध आयुष्यावर विश्वास ठेवतात. त्यांचं म्हणनं आहे की सेलिब्रेटी फिटनेस आणि सिक्स पैक्ससाठी एक महिन्याचं डाईट आणि व्यायाम करतात. त्यांचे सिक्सपैक्स लवकर होतात. त्यामुळे त्यांचं डाईट तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून फॉलो करू नका. यावेळी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारचं उदाहरण दिलं. अक्षय कुमार सकाळी लवकर उठतो आणि लवकर झोपतो. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला डाईट आणि व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. व्यायाम केल्यानं तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल.

Loading Comments