Advertisement

नारळाच्या करवंट्यांपासून हा ब्रँड बनवतो इको फ्रेंडली ज्वेलरी

फॅशनमध्येही हल्ली पर्यावरणपूरक फॅशनचा बोलबाला वाढलाय आणि फॅशन कपड्यांपर्यंत मर्यादित न राहता आता अॅक्सेसरीज देखील इको फ्रेंडली होत आहेत. हाच ट्रेंड हल्ली बायो ज्वेलरी किंवा ऑरगॅनिक ज्वेलरी म्हणून प्रसिद्ध होतोय.

नारळाच्या करवंट्यांपासून हा ब्रँड बनवतो इको फ्रेंडली ज्वेलरी
SHARES

इको फ्रेंडली, नॅचरल, ऑरगॅनिक असा उल्लेख हल्ली अनेक वस्तूंवर, पदार्थांवर आणि अगदी कपड्यांबाबतही करण्यात येतो. एकप्रकारे पर्यावरण लाइफस्टाईलची ही सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा जरी ट्रेंड असला तरी यामुळे समाजात चांगला पायंडा पडत आहे. फॅशनमध्येही हल्ली पर्यावरणपूरक फॅशनचा बोलबाला वाढलाय आणि फॅशन कपड्यांपर्यंत मर्यादीत न राहता आता अॅक्सेसरीजदेखील इको फ्रेंडली होत आहेत. हाच ट्रेंड हल्ली बायो ज्वेलरी किंवा ऑरगॅनिक ज्वेलरी म्हणून प्रसिद्ध होतोय. असाच एक मुंबईतील ऑनलाईन ब्रँड आहे जो इको फ्रेंडली आणि हँडमेड ज्वेलरी बनवतो.



इको फ्रेंडली ज्वेलरीची क्रेझ

माणसाच्या आयुष्यात प्लास्टिकचा शिरकाव होण्यापूर्वी खरं तर स्त्रिया निसर्गालंकारांनीच नटायच्या. लाकूड, नारळाच्या करवंट्या, शंख-शिंपले याचा वापर करून कानातले, गळ्यातल्या माळा बनवण्यात यायच्या. पण नंतरच्या काळात धातूच्या ज्वेलरीचा ट्रेंड आला. पण आता पुन्हा एकदा आपण इको-फ्रेंडली ज्वेलरीकडे वळलो आहोत. 'अर्बन कला' या ऑनलाईन बँडनं हा ट्रेंड उचलून धरला आणि तो महिलांच्या पसंतीस देखील उतरला.


टाकाऊ ते टिकाऊ

टाकाऊपासून टिकाऊच्या ट्रेंडमध्ये नैसर्गिक पदार्थ म्हणजे नारळाच्या करवंट्या, लाकूड, वायर आदीपासून सुंदर अशी ज्वेलरी बनवण्यात येते. यामध्ये अँकलेट्स, ब्रेसलेट, कानातले, अंगठी, नथ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी तुम्हाला इथं मिळतील. ज्वेलरीमध्ये पेंटेड आणि वायर असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. पेंटेडमध्ये लाकडावर पेंट केलेली ज्वेलरी आहे. तर वायरमध्ये वायरचा वापर करून बनवण्यात आलेली ज्वेलरी पहायला मिळते.

ज्वेलरी आणि बरंच काही

अर्बन कला हा ब्रँड फक्त ज्वेलरीच नाही तर अनेक वस्तू बनवतात. घर सजवण्यासाठी बॉटल लँम्प, क्लॉक्स, किटली, चावी ठेवायचा स्टँड, बॅग्स, बुकमार्क्स, किचेन्स आदी सुद्धा इथं उपलब्ध आहे. तुम्हाला कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी फक्त एका क्लिकवर तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे. तुम्ही मागवलेलं सामान घरपोच केलं जाईल.


अर्बन कला ऑनलाईन ब्रँड आहे. या लिंकवर http://www.urbankala.com/ क्लिक करून तुम्ही त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. वेबसाईटवरच तुम्हाला प्रत्येक वस्तूच्या किंमती कळतील.


वेबसाईट : http://www.urbankala.com/



हेही वाचा

आता घरातली पेंटिंग्जही मिळणार भाड्याने!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा