Advertisement

साईज कोणतीही असो..'या' ब्रॅण्डची हमखास कपड्यांची गॅरंटी!

जर तुम्ही फॅट असाल तर मग तुम्हाला खूपच कमी पर्याय आहेत. मग डिझाईन कशी ही असो, पण माझ्या साईजचा आहे, अशी स्वत:ची समजूत घालावी लागते. असंच काहीसं दु:ख एकदम सडपातळ असणाऱ्या महिलांचं आहे. मात्र, फॅशन डिझायनर देबश्री डेब हिनं एक पाऊल पुढे जात ही स्टीरिओटाईप थिंकिंग बदलण्याचा प्रयत्न केला आहे.

साईज कोणतीही असो..'या' ब्रॅण्डची हमखास कपड्यांची गॅरंटी!
SHARES

टीव्हीवर एखाद्या अभिनेत्रीला पाहिल्यावर बहुतांश महिलांना वाटतं की माझी झिरो फिगर असती किंवा मी तिच्यासारखी स्लिमट्रिम असते तर? मला देखील तिच्यासारखे सेक्सी, कूल कपडे घालता आले असते. देखणं रूप आणि उत्तम फिगर असं समीकरण आपल्याकडे जुळलेलं आहे. त्यामुळे शॉप किंवा मॉलमध्ये काही ठराविक साईजचे कपडे तुम्हाला आढळतील. सर्वात कमी एस साईज आणि सर्वात मोठी आणि शेवटची डबल एक्सएल साईज असे पर्याय असतात. खूप क्वचित जागी ट्रिपल एक्सएल हा पर्यायही असतो.

जर तुम्ही फॅट असाल तर मग तुम्हाला खूपच कमी पर्याय आहेत. मग डिझाईन कशी ही असो, पण माझ्या साईजचा आहे, अशी स्वत:ची समजूत घालावी लागते. असंच काहीसं दु:ख एकदम सडपातळ असणाऱ्या महिलांचं आहे. एसहून कमी साईज येत नसल्यानं अशा महिलांना प्रत्येकवेळी टीशर्ट, शर्ट, स्कर्ट किंवा इतर कुठले कपडे हे फिटिंगसाठी अॉल्टर करून घेत बसावं लागतं. त्यात तेवढा पैसा तर जातोच शिवाय वेळही जातो. पण फॅशन डिझायनर देबश्री डेब हिनं एक पाऊल पुढे जात ही स्टीरिओटाईप थिंकिंग बदलण्याचा प्रयत्न केला आहे.


 


कुठल्याही फिगरसाठी 'अनटच्ड ब्रँड'

देबश्रीनं 'अनटच्ड' नावाचा कपड्यांचा ब्रँड खास महिलांसाठी लाँच केला आहे. बाजारात कपड्यांचे अनेक ब्रँड उपलब्ध आहेत. पण या ब्रँडचे मापदंड ठरलेले असतात. कमीत कमी एक्सएसपासून ते जास्तीत जास्त ट्रिपल एक्स साईजमध्ये काही ब्रँडचे कपडे उपलब्ध असतात. पण कुणाला एक्सएस साईजहून लहान तर कुणाला ट्रिपल एक्स साईजहून अधिकची साईज हवी असेल तर? अशा वेळी महिलांकडे पर्यायच नसतो. पण आता 'अनटच्ड' या ब्रँडमुळे महिलांना कुठल्याही साईजचे कपडे मिळू शकणार आहेत. पण सुरुवातीला देबश्रीनं फक्त जरी वर्क असलेले स्कर्ट्स महिलांसाठी लाँच केले आहेत.



सुरुवात आम्ही स्कर्टपासून केली आहे. कारण भारतात फॅशन इंडस्ट्रीमध्ये फक्त स्कर्ट्सवर फोकस करणारे ब्रँड कमीच आहेत. त्यामुळे जरी वर्क असणारे स्कर्ट्स आणि बो आम्ही लाँच केले आहेत. पण लवकरच आम्ही कपड्याचे नवीन कलेक्शन लाँच करणार आहोत. यात फक्त नवीन स्कर्ट्सच नाही, तर सर्व प्रकारचे कपडे महिलांसाठी उपलब्ध असतील.

आमच्याकडे सर्व साईजचे स्कर्ट उपलब्ध आहेत. एक्सएस साईजहून कमी आणि ट्रिपल एक्स साईजहून अधिक साईजचे स्कर्ट आम्ही विकले आहेत. अनटच्डची वेबसाईटही आहे. वेबसाईटवर आम्ही बॉडी टाईपनुसार स्कर्ट्स उपलब्ध करून दिले आहेत. ट्रँगल, इनव्हर्टेड ट्रँगल, रेक्टँगल आणि फुल फिगर्ड असे चार बॉडी टाईप वेबसाईटवर दिले आहेत. या बॉडी टाईपशिवाय तुमच्या साईजनुसार स्कर्ट शिवूनदेखील दिले जातात. यासाठी वेबसाईटवरच तुम्हाला वेस्ट, हिप आणि थाईजचे माप द्यावे लागेल. त्यानुसार तुमचा स्कर्ट तयार केला जाईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलाही जाईल.

देबश्री डेब, फॅशन डिझायनर



स्कर्टची खासियत  

ब्रोकेड म्हणजेच जरी वर्क असणारे मेटेरियल. सध्या ब्रोकेड फॅब्रिक तरूणी आणि स्त्रियांच्या अधिक पसंतीस उतरत आहे.  कारण या स्कर्टचा सुंदर आणि रॉयल लूक महिलांना आकर्षित करत आहे. मोगल काळापासूनच ब्रोकेड मटेरियलचा वापर केला जातो. याचं मुख्य कारण होतं, सिल्व्हर, गोल्डन आणि कॉटन फॅब्रिक्स. हाच धागा पकडून देबश्रीनं ब्रोकेड मटेरियलमध्ये स्कर्ट लाँच केले आहेत.



प्रडा आणि गुची सारखे प्रसिद्ध आणि मोठे फॅशन ब्रँड ब्रोकेड मटेरियलचा वापर करतात. पण या मोठ्या ब्रँड्सनी तयार केलेले कपडे हे ठराविक साईज आणि कपड्यांच्या स्टाईलसाठी उपलब्ध असतात. मात्र, देबश्रीला हीच संकल्पना बदलायची होती. सो तिनं ब्रोकेड या मटेरियलचे कपडे सर्व साईजच्या महिलांसाठी उपलब्ध करून द्यायचं ठरवलंत्यामुळे देबश्रीनं अनटच्ड हा ब्रँड लाँच केला.




स्कर्ट्सची किंमत   ?

तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि स्टाईलमध्ये इथं स्कर्ट्स उपलब्ध असतात. कमीत कमी १५९९ रुपये आणि जास्तीत जास्त १९९९ रुपये तुम्हाला मोजावे लागतील. अनटच्ड या ब्रँडच्या अधिक माहितीसाठी https://www.beuntouched.com/product-category/ या त्यांच्या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटवरूनच तुम्ही स्कर्ट्सची ऑर्डर देऊ शकता!



A post shared by beuntouched (@beuntouched) on



हेही वाचा

अरे व्वा! आता कपडेही मिळणार हप्त्यांवर!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा