• YAMAHA ची ३ चाकी स्कुटर पाहिलीत का?
  • YAMAHA ची ३ चाकी स्कुटर पाहिलीत का?
SHARE

टू व्हीलर गाड्यांच्या यादीत प्रसिद्ध असलेल्या YAMAHA कंपनीनं एक अनोखी स्कूटर तयार केली आहे. YAMAHA नं या स्कूटरचं नाव Tricity300 असं ठेवलं असून ही स्कूटर २ चाकी नसून ३ चाकी आहे. अर्बन मोबिलिटीला लक्षात घेत कंपनीनं ही स्कूटर डिझाईन केली आहे. या स्कूटरच्या पुढच्या बाजूला २ चाकं देण्यात आली आहेत.


टोक्योमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टोक्यो मोटर शो २०१९ मध्ये ही स्कूटर कंपनीनं पहिल्यांदा लाँच करण्यात आली. 3CT कॉन्सेप्टवर ही स्कूटर तयार करण्यात आली असून अद्याप कंपनीकडून या स्कुटरच्या किंमतीबाबत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत अधिकृत माहिती दिली नाही.

लांबच्या प्रवासासाठी आणि हायवेवर चालवण्यासाठी ही स्कुटर उत्तम मानली जात आहे. या स्कुटरमध्ये २९२ सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन लिक्विड कूल्ड, ४ स्ट्रोक, ४ व्हॉल्व्ह,सिंगल सिलिंडर एसओएचसी टाईप इंजिन असणार आहे. तसंच या स्कुटरचं एकूण वजन २३९ किलो असेल. तसंच याची फ्युअल टँक क्षमता १३ लीटरची असेल. ही स्कुटर ३ रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.


या स्कुटरचा एक व्हिडीओ कंपनीनं आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही स्कुटर युरोपियन बाजारात लाँच करण्यात येणार आहे. परंतु भारतात ही स्कुटर केव्हा लाँच होणार याबाीत माहिती अस्पष्ट आहे.हेही वाचा -

शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदात वाटा मागितल्यामुळेच तिढा - मुनगंटीवार

केंद्र शासित प्रदेशाचे पहिले मराठी पोलिस प्रमुखसंबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ