Advertisement

मनोरा पुनर्विकास- आमदारांना मिळणार १००० चौरस फुटाचं घर


मनोरा पुनर्विकास- आमदारांना मिळणार १००० चौरस फुटाचं घर
SHARES

चर्चगेटमधील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाच्या बांधकामाला  डिसेंबर २०१८ मध्ये सुरूवात होणार आहे. तर  या पुनर्विकासात आमदारांना पंचतारांकित सुविधा असलेलं १००० चौ. फुटाचं घर देण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन काॅर्पोरेशन (एनबीसीसी) चे व्यवस्थापकीय संचालक अनुपकुमार मित्तल यांनी दिली.


पुनर्विकासाचं काम एनबीसीकडे

 मनोरा आमदार निवासस्थान धोकादायक झालं असून ते रिकामं करण्यात आलं आहे. तर राज्य सरकारनं मनोरा आमदार निवासाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या पुनर्विकासाचं काम एनबीसीकडे सोपवण्यात आलं आहे. एनबीसीसीनं पुनर्विकासाचा अंतिम आराखडा तयार केला असून हा पुनर्विकास नेमका कसा असेल याची माहिती शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिली.


दोन इमारती बांधणार

पुनर्विकास आराखड्यानुसार दोन इमारती बांधण्यात येणार असून यातील एक इमारत ५५ मजल्यांची तर दुसरी इमारत ३२ मजल्यांची असणार आहे. या दोन इमारती एकमेकांना एका ब्रीजनं जोडण्यात येणार असून हा ब्रीज ३२ मजल्यांची इमारत असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून पुढे ५५ मजल्यांच्या इमारतीला जोडला जाणार आहे. या इमारतीत कॅण्टीन, जीम यासह अन्यही सुविधा असणार आहेत.


५०० कोटींचा खर्च

या दोन्ही इमारती मिळून आमदारांसाठी एकूण ३७३ घरं असणार आहेत. या निवासस्थानाचं क्षेत्रफळ १००० चौ. फुट इतकं असणार आहे. तर या १००० चौ. फुटातील ६०० चौ. फुटाचं क्षेत्रफळ आमदारांसाठी तर उर्वरित ४०० चौ. फुट क्षेत्रफळ व्हिजिटर्सच्या वापरासाठी असणार आहे. अशा या मनोरा पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष बांधकामाला येत्या डिसेंबर महिन्यात सुरूवात होणार असून काम सुरू झाल्यापासून अडीच वर्षात काम पूर्ण करण्यात येणार असल्याचंही मित्तल यांनी सांगितलं आहे. या प्रकल्पासाठी एकूण ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.हेही वाचा -

परप्रांतीय कलाकाराची राज ठाकरेंना वाढदिवसाची अनोखी भेट

अमेरिकतील उपचारांनंतर मनोहर पर्रीकर गोव्यात परतले


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा