Advertisement

गणेश नाईकांना पुन्हा धक्का, भाजप नगरसेविका माजी नगरसेवक पतीसह राष्ट्रवादीत

नवी मुंबई महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गळती सुरुच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गणेश नाईक यांना लागोपाठ धक्के दिले आहेत.

गणेश नाईकांना पुन्हा धक्का, भाजप नगरसेविका माजी नगरसेवक पतीसह राष्ट्रवादीत
SHARES

माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी पक्ष प्रवेश केलानवी मुंबई महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गळती सुरुच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गणेश नाईक यांना लागोपाठ धक्के दिले आहेत. 

गणेश नाईक यांचे खंदे समर्थक असलेल्या नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. 

आता वाशीतील नगरसेविका दिव्या गायकवाड आणि त्यांचे पती माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिव्या गायकवाड प्रभाग क्रमांक ६४ मधून नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या. वैभव व दिव्या गायकवाड हे गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. गणेश नाईक यांच्यासह गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.ही वाचा -

लोकलमध्ये लवकरच उपलब्ध होणार वायफाय

मुंबई ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टवर बंदी 
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा