Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार फौजिया खान यांची कोरोनव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार फौजिया खान यांची कोरोनव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्यसभेचे सदस्य, फौजिया खान यांनी COVID 19 साठी एन्टीजन चाचणी केली आणि त्यांची चाचणी परभणीत पॉझिटिव्ह आली.

माध्यमांच्या वृत्तानुसार, परभणीच्या जिल्हा प्रशासनानं फौजिया खान राहत असलेला परिसर सील केला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना चाचणी करण्यास सांगितलं आहे. फौजिया खान राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या माजी मंत्री आहेत.

हेही वाचा : दहिसरचे भाजप नगरसेवक जगदीश ओझा कोराेना पाॅझिटिव्ह

अलीकडेच, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही कोरोनोव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी स्वत:ला मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन केलं आहे. औरंगाबाद इथल्या सिल्लोड विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे सत्तार यांनी फेसबुकवर माहिती दिली की, माझी COVID 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वत:ची कोरोनाव्हायरसची चाचणी करून घ्यावी.


सोमवारी महाराष्ट्राचे मंत्री असलम शेख यांनीही कोरोनव्हायरस झाल्याचं समोर आलं. उद्धव ठाकरे सरकारमधील आतापर्यंत पाच कॅबिनेट मंत्र्यांची COVID 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री म्हणजे जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांची कोरोनोव्हायरसची पॉझिटिव्ह चाचणी घेण्यात आली होती. तथापि, ते सर्व बरे झाले आहेत.



हेही वाचा

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

Ram Mandir: उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाऊ नये, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मत


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा