Advertisement

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवरून शिवसेना गोंधळात


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवरून शिवसेना गोंधळात
SHARES

भारतीय जनता पार्टीच्या ड्रीम प्रोजेक्ट्सपैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाबाबत शिवसेना शुक्रवारी सभागृहात गोंधळलेली दिसली. सभागृहातील नियम 97 नुसार झालेल्या अाल्पकालीन चर्चेदरम्यान काँग्रेस आमदार संजय दत्त म्हणाले, राज्यावर साडेचार लाख कोटींचे कर्ज असताना या प्रकल्पासाठी 98 हजार कोटी एवढा खर्च का? हे सरकार सामान्य लोकांसाठी नाही? हे सूटबूट वाल्यांचे सरकार असल्याचा आरोप करत या प्रकल्पाला विरोध दर्शवला.

संजय दत्त यांनी मांडलेल्या मुद्द्याला शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी देखील दुजोरा देत बुलेट ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पार्किंगची सोय कुठे करणार? ही तर अंधारात मारलेली कुऱ्हाड लोकांच्या हितासाठी नाही, असे सांगत विरोध दर्शवला. मात्र शिवसेना आमदार आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या प्रकल्पासाठी 80 टक्के कर्ज हे जपानी बँकेचे आहे, तर 10 टक्के कर्ज राज्य आणि 10 टक्के केंद्र सरकार देणार आहे. हे कर्ज 50 वर्षांकरता असून पहिलीे 10 वर्ष कर्जफेड असणार नाही.

या बुलेट ट्रेनचे भाडे दीडपट आहे. पण ही गाडी विमानापेक्षाही आधी पोहोचणार. जर एवढा कमी वेळ लागणार असेल तर, महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लागेल, असे सांगत अप्रत्यक्ष प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे एकीकडे या प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना सभागृहात मात्र द्विधा मनःस्थितीत पहायला मिळाली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा 508 किलो मीटर लांबीचा प्रकल्प असून, यात एकूण 12 स्टेशन येणार आहेत. यातले 4 स्टेशन महाराष्ट्रात तर 8 स्टेशन गुजरातमध्ये असणार आहेत. मात्र या प्रकल्पाबाबत एवढी गुप्तता का पाळली जात आहे? बुलेट ट्रेनचं भाडं हे फर्स्ट एसीच्या भाड्यापेक्षा दुप्पट आहे. विमानाचा प्रवास स्वस्त असताना लोक बुलेट ट्रेनने का जातील?

संजय दत्त, आमदार काँग्रेस


हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी हा प्रकल्प म्हणजे मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादचे महत्त्व वाढवण्याचा केंद्राचा डाव असल्याचे सांगत सरकारवर टीका केली. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी मुंबई लोकलकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प का केला? लोकल ट्रेनला प्राधान्य द्या, पंतप्रधान यांच्या स्वप्नामध्ये गरीब लोक असू द्या, असे सांगत मोदींवर जोरदार टीका केली.

बिकेसीला अद्याप मान्यता नाही. संपूर्ण पार्किंग हे अंडरग्राऊंड असणार आहे. या प्रकल्पाला जमीन कमी लागणार आहे.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री



हेही वाचा - 

‘जय महाराष्ट्र’ मुळे दिवाकर रावते पेचात

बीकेसीतून 2022 मध्ये धावणार पहिली बुलेट ट्रेन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा