Advertisement

Mutual Fund भाग ६ : हायब्रीड आणि इंडेक्स फंड

मागील लेखांमध्ये आपण इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडांचे प्रकार पाहिले. या लेखात आणि बॅलन्स/हायब्रीड फंड आणि इंडेक्स फंडाची माहिती घेणार आहोत.

Mutual Fund भाग ६ : हायब्रीड आणि इंडेक्स फंड
SHARES

मागील लेखांमध्ये आपण इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडांचे प्रकार पाहिले. या लेखात आणि  बॅलन्स/हायब्रीड फंड आणि इंडेक्स फंडाची माहिती घेणार आहोत.


) बॅलन्स/हायब्रीड फंड

म्युच्युअल फंडाच्या इक्विटी फंड  प्रकारात गुंतवणुकदारांची गुंतवणूक शेअर्समध्ये केली जाते. तर डेट फंड प्रकारात गुंतवणूक केंद्र सरकार,राज्य सरकार,खासगी कंपन्या, सरकारी बँका,खासगी बँका आदींच्या रोख्यांमध्ये गुंतवली जाते. हायब्रीड फंड हे इक्विटी आणि डेट यांचे मिश्रण असतात. म्हणजे हायब्रीड फंडांमधील गुंतवणूक ही शेअर्स आणि रोख्यांमध्ये केली जाते. म्युच्युअल फंडांत प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांना हायब्रीड फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

कोणत्या प्रकारच्या फंडात गुंतवणूक करायची हे ठरवणं कठीण असतं. त्यामुळे वेगवेगळ्या फंडात गुंतवणूक करण्यास उत्सुक नसलेल्यांनी हायब्रीड फंड निवडावा. यामधील इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवणूक केली जात असल्याने जोखीम कमी होते. यामधील इक्विटी दीर्घकालीन परतावा देतो. तर डेट तुमच्या पोर्टफोलिओला स्थैर्य देतो. इक्विटी किंवा डेटमध्ये कोणालाही फटका बसला तरी जास्त जोखीम नसते. म्हणजे हायब्रीड फंडात लाभ आणि जोखीम यांचा समतोल साधला जातो. काही फंडांनी मुलांसाठी तसंच जेष्ठ नागरिकांसाठीही हायब्रीड म्युचुअल फंड योजना तयार केल्या आहेत.

६५ टक्क्यांपेक्षा डेट ओरिएंटेड हायब्रीड फंड  अधिक इक्विटीमध्ये गुंतवणूक असलेल्या फंडांना इक्विटी फंडांप्रमाणे कर लागू होतो. जर या फंडातील गुंतवणूक एक वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यास कर द्यावा लागत नाही. एक वर्षाच्या आतील गुंतवणुकीवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. अनेक गुंतवणूकदार या फंडातील लाभांशाचा पर्याय निवडतात. कारण लाभांश करमुक्त असतो. नव्या कायद्यानुसार आता ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी डेट फंडात रक्कम ठेवल्यास त्यावर कर लागू होतो. अशावेळी बॅलन्स्ड फंड हा उत्तम पर्याय ठरतो.


हायब्रीड फंडांचे प्रकार

इक्विटी ओरिएंटेडडेट ओरिएंटेड हायब्रीड फंड   हायब्रीड फंड  

या फंडात इक्विटीमध्ये अधिक गुंतवणूक असते. ६५ टक्के  रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जाते. तर उरलेली रक्कम डेटमध्ये असते. शेअर बाजाराच्या चढ-उतारानुसार इक्विटीमध्ये चढ-उतार होता. पण डेटमध्ये काही प्रमाणात स्थिरता असते. सगळीच गुंतवणूक जर इक्विटीमध्ये केली गेली तर शेअर बाजार कोसळल्यानंतर फटका बसू शकतो. त्यामुळे हायब्रीड फंडाचा मध्यम मार्ग सोयीचा आहे

डेट ओरिएंटेड हायब्रीड फंड  डेट ओरिएंटेड हायब्रीड फंड  

ह्या फंडामध्ये ६० टक्के रक्कम डेट म्हणजे रोख्यांमध्ये गुंतवली जाते. उर्वरीत रक्कम शेअर्स अाणि अन्य साधनांमध्ये गुंतवली जाते. ज्यांना शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक करायची नसते, ते या फंडात पैसे गुंतवतात. रोख्यातील गुंतवणूक थोडी अधिक सुरक्षित वाटते. शेअर बाजारातील मोठ्या घसरणीचा फारसा फटका या फंडांना बसत नाही.) इंडेक्स फंड

सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा तर निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुंतवणूक करता येते. ज्या फंडांची गुंतवणूक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये असते त्या फंडांना इंडेक्स फंड म्हणतात. सेन्सेक्समध्ये गुंतवणूक असलेल्या इंडेक्स म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास सेन्सेक्समधील ३० कंपन्यांच्या शेअर्समध्ये एकप्रकारे अप्रत्यक्ष गुंतवणूक होते. त्यामुळे सेन्सेक्स वाढेल तसा या फंडातून परतावा मिळतो. असाच परतावा निफ्टीत गुंतवणूक करणाऱ्या फंडांमधून मिळू शकतो. निफ्टीमध्ये ५० कंपन्यांचे शेअर्स असतात.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वेगवेगळ्या उद्योगातील आकाराने आणि भागभांडवलाने मोठ्या असणाऱ्या निवडक कंपन्यांचा समावेश असतो. नसेन्सेक्स आणि निफ्टीत गुंतवणूक करणाऱ्या इंडेक्स फंडात गुंतवणूक केल्यास  भारतीय शेअर बाजारातील अत्यंत निवडक कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्याचे फायदे मिळतात. शेअर बाजारातील बहुतेक सर्व क्षेत्रामध्ये इंडेक्‍स फंडाची गुंतवणूक असल्याने डायव्हर्सिफाइड फंडाचे फायदे आणि स्थैर्य अशा फंडांना मिळते. शेअर बाजारात नव्याने प्रवेश करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी इंडेक्‍स फंड योग्य ठरतात. इतर गुंतवणूक जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवलेली असेल तर थोडी रक्कम कमी जोखीम असलेल्या इंडेक्‍स फंडात नियमितपणे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते.हेही वाचा  -

Mutual Fund भाग १ : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का? जाणून घेऊया म्युच्युअल फंडाविषयी

Mutual Fund भाग २ : 'हे' आहेत म्युच्युअल फंडाचे १० फायदे

Mutual Fund भाग ३ : 'हे' आहेत म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचे बहुपर्याय

Mutual Fund भाग ४ : सर्वाधिक परतावा देणारे इक्विटी म्युच्युअल फंड

Mutual Fund भाग ५ : सुरक्षित गुंतवणुकीसाठी निवडा 'हे' डेट फंड
संबंधित विषय