Advertisement

पालिकेनं सुरू केला व्हॉट्सअॅप नंबर, 'अशी' मिळवा सर्व सुविधांची माहिती

मुंबई महापालिकेनं हा नवा उपक्रम सुरू केला आहे.

पालिकेनं सुरू केला व्हॉट्सअॅप नंबर, 'अशी' मिळवा सर्व सुविधांची माहिती
(Representational Image)
SHARES

मुंबई महापालिकेनं नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 8999-22-8999 या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहेत.

या सुविधेमुळे ८० पेक्षा अधिक सेवा सुविधा नागरिकांना हातातील मोबाईलवर मिळतील, काही सेकंदात नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण होईल. देशातला असा हा पहिलाच उपक्रम आहे अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.

नागरिकांना घरी बसून गणपती परवाना, लायसन फी, वॉर्ड नंबरची माहिती मिळणे, वॉर्ड ऑफीसरचे नाव आणि इतर प्रश्न त्यांना या व्हॉटसअप चॅटद्वारे देण्यास मदत होणार आहे. ही माहिती देतांना महापालिकेच्या आणि व्हॉटसअप टीमच्या लोकांनी अचूक, परिपूर्ण माहिती मिळेल याची काळजी घ्यावी, असंही त्यांनी बजावलं.

मुंबई महापालिकेची ही सेवा २४ तास सुरू राहणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कोरोनाकाळात मनुष्य संपर्क विरहीत काम करतांना जन्मापासून मृत्यूपर्यंतची एकूण एक प्रमाणत्रे या व्हॉटसॲप सुविधेद्वारे उपलब्ध होतील, असं त्या म्हणाल्या.  

त्या पुढे म्हणाल्या की, मुंबईकरांना ही सुविधा उपलब्ध करून देतांना खुप आनंद आणि समाधान वाटते. मुंबईकरांना नागरी सेवा सुविधा तत्परपणे उपलब्ध करून देण्यात महापालिका नेहमीच अग्रेसर आहे. संक्रमणात नवीन काही तरी शोधणे अपेक्षित आहे, त्यामुळे आजचा दिवस अतिशय औचित्यपूर्ण आहे.

कसे वापरायचे

  • BMC नं +91 89992 28999 WhatsApp क्रमांक जाहीर केला आहे. याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या फोनमध्ये नंबर सेव्ह करा.
  • नंबर सेव्ह केल्यानंतर, या नंबरवर व्हॉट्सअॅपवर जा आणि "HI" लिहा.
  • "HI" टाइप केल्यानंतर भाषा निवडा आणि दिलेल्या सुविधांचा लाभ घ्या.हेही वाचा

जानेवारीत आढळले सर्वाधिक कोरोनारुग्ण

मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा