Advertisement

उस्मानाबादची कराटे पटू प्रणिता पवारचे राज ठाकरेंनी स्विकारले पालकत्व

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कराटे पटूची अशी अवस्था पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिच्या मदतीला धावून आले आहेत.

उस्मानाबादची कराटे पटू प्रणिता पवारचे राज ठाकरेंनी स्विकारले पालकत्व
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ तांडा इथल्या उत्कृष्ट कराटे पटूचं पालकत्व स्विकारलं आहे. प्रणिता मोहन पवार (Pranita Pawar) असं या मुलीचं नाव आहे.

२०१७ मध्ये प्रणितानं श्रीलंका इथं झालेल्या ऑलिपिंक स्पर्धेत (Olympic Competition) कराटेमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाची मान उंचावली होती.

दीड वर्षापूर्वी पवार कुटुंबियांवर संकट कोसळलं. प्रणिताचे वडील कोरोना संसर्गाने आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आज पवार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. पण तिच्या मदतीला राज ठाकरे (Raj Thackeray) धावून आले आहेत.

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कराटे पटूची अशी अवस्था पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रणिता पवार आणि तिच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. प्रणिताचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र कोरोना काळात त्यांचं निधन झालं. आता प्रणिताची आई कसाबसा रोजगार मिळवून तीन मुलांचा सांभाळ करत आहेत.

प्रणिताला अर्थसहाय्य करण्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रणिताला अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी प्रणिताशी संवाद साधला. तसंच तिचे पालकत्व घेण्याचाही निर्णय जाहीर केला.

उस्मानाबादचे मनसे जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांनी प्रणिता पवार हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन तिचा राज ठाकरे यांच्याशी संवाद घडवून आणला. तसंच तिच्या आतापर्यंतच्या क्रीडा विषयक कामगिरीची माहिती घेतली.

राज ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, प्रणिताचे शैक्षणिक पालकत्व ते स्वीकारत असल्याचे कुटुंबियांना सांगितलं. घरातला मुख्य आधार कोलमडून पडल्यामुळे निराधार झालेल्या पवार कुटुंबियांना राज ठाकरे यांच्या मदतीमुळे काहीसा आशेचा किरण दिसत आहे.



हेही वाचा

युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांचेही भारताने वाचवले प्राण

वरळी सिलिंडर स्फोट प्रकरण : ५ वर्षांच्या विष्णूला शिवसेनेनं घेतलं दत्तक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा