Advertisement

दुसऱ्या बायकोचा नाही, पण मुलांचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क - हायकोर्ट

दोन विवाह केलेल्या पतीच्या मालमत्तेवर केवळ पहिल्या पत्नीलाच अधिकार मिळतो. मात्र दोन्ही पत्नींच्या मुलांना मालमत्तेतील हिस्सा मिळू शकतो.

दुसऱ्या बायकोचा नाही, पण मुलांचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क - हायकोर्ट
SHARES

दोन विवाह केलेल्या पतीच्या मालमत्तेवर केवळ पहिल्या पत्नीलाच अधिकार मिळतो. मात्र दोन्ही पत्नींच्या मुलांना मालमत्तेतील हिस्सा मिळू शकतो, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी एका प्रकरणात व्यक्त केलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आर्थिक रकमेवर त्याच्या दोन पत्नींनी दावा केला.

महाराष्ट्र रेल्वे पोलीस दलात काम करणाऱ्या सहाय्यक उपनिरीक्षकाचा COVID 19 मुळे ३० मे रोजी मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या पत्नीच्या मुलीनं यासंदर्भात याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली.

राज्य सरकारनं कोविड योद्धांच्या वारसांना विशेष मदत जाहीर केली आहे. त्यानुसार सुमारे ६५ लाख रुपयांची रक्कम दिवंगत कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे. मात्र या रकमेवर दावा दाखल करणारे दोन अर्ज सरकारकडे आले होते.

मृत पोलिसाच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलीनं या आर्थिक रकमेतील हिस्सा मागण्यासाठी आई आणि स्वतःच्या वतीनं याचिका केली आहे. वडील हेच घराचा आधार होते, जर यातली रक्कम मिळाली नाही तर आमची राहण्याची आणि खाण्यापिण्याची आबाळ होतील, असा दावा या याचिकेतून केला आहे.

राज्य सरकारच्यावतीनं सर्व रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याचं वाटप करावं, असं सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी कोर्टाला सांगितलं.

बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये पहिल्या पत्नीची मुलगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर होती. वडिलांच्या दुसऱ्या कुटुंबाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, असं तिनं कोर्टाला सांगितलं. मात्र दुसऱ्या पत्नीच्या मुलीनं सांगितलं की, ती आणि पहिल्या पत्नीची मुलगी या फेसबुकवर एकमेकांना ओळखतात आणि दोघींना त्यांच्या नात्याची माहिती आहे. 

दिवंगत पोलीस दुसऱ्या पत्नीसह धारावीतील रेल्वे वसाहतीमध्ये राहत होता, असा दावा याचिकादारांनी कोर्टात केला. त्यावर गुरूवारी होणाऱ्या पुढील सुनावणीला पहिली पत्नी आणि तिच्या मुलीनं याबाबत खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.



हेही वाचा

NEET-JEE Main परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्क्यांवर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा