Advertisement

व्हॉट्स अॅप युजर्सनो सावधान...

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. इतर मेसेजेसप्रमाणे यातील तथ्य देखील न तपासता हा मेसेज व्हायरल केला जात आहे. यामध्ये युजर्सना व्हॉट्सअॅप अपग्रेड करण्यासाठी एक लिंक पाठवली जात आहे. या व्हर्जनचं नाव गोल्ड आहे.

व्हॉट्स अॅप युजर्सनो सावधान...
SHARES

आजकाल सोशल मीडियामध्ये मेसेजेस झटपट फॉरवर्ड केले जातात. त्यामधील तथ्य न तपासताच आपण त्यावर क्लिक करतो. आपल्या याच घाणेरड्या सवयीमुळे आपण आपली खाजगी माहिती दुसऱ्यांना देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली खाजगी माहिती चोरली गेल्याचं आपल्याला कळत देखील नाही. अनेक जण फेसबुकवरील क्विज खेळतात. या क्विजच्या मदतीनं आपली खाजगी माहिती चोरली जात असते. व्हॉट्स अॅप देखील या मेसेजेसचा बळी ठरला आहे. नक्की काय आहे हा मेसेज पाहूया.


युजर्स सावधान

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. इतर मेसेजेसप्रमाणे यातील तथ्य देखील न तपासता हा मेसेज व्हायरल केला जात आहे. यामध्ये युजर्सना व्हॉट्सअॅप अपग्रेड करण्यासाठी एक लिंक पाठवली जात आहे. या व्हर्जनचं नाव गोल्ड आहे. तुम्हाला असा कुठला मेसेज आला तर त्यावर क्लिक करू नका किंवा इनस्टॉल करू नका. कारण हा एक प्रकारचा स्कॅम आहे. या लिंकवर जाऊन इनस्टॉल केले तर तुमचा डेटा हॅक होऊन हॅकर्सच्या हाती लागू शकतो.

मेसेजसोबत लिहिलं आहे की, या नवीन व्हर्जनला तुम्ही डाउनलोड करून इनस्टॉल केलं तर तुम्ही एकाच वेळेस १०० लोकांना फोटो पाठवू शकता. त्यासोबतच तुम्ही पाठवलेले मेसेज कधीही डिलीट करू शकता. पण असं काहीच नाही. या लिंकमध्ये एक प्रकारचा व्हायरस आहे जो तुमच्या फोनमधील सगळा डेटा हॅक करतो.


व्हॉट्सअॅपचं स्पष्टीकरण

व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आलं आहे की, त्यांच्याकडून कोणतेही गोल्ड व्हर्जन लॉन्च करण्यात आलेले नाही. हा हॅकर्सचा कट आहे. त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही प्रकारच्या लिंकवर जाऊन काही इनस्टॉल करू नका. यामुळे तुमची खसगी माहिती चोरीला जाऊ शकते. जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये या व्हायरसवाल्या लिंकवरून काही इनस्टॉल केलेले असेल तर लगेच तुमचा मोबाइल रीसेट करा.


हेही वाचा

तुमचा स्मार्टफोन तुमच्यावर नजर तर नाही ठेवत?

तुमच्या महत्त्वाच्या डॉक्यूमेंट्ससाठी डिजीलॉकरचा नवा पर्याय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा