Advertisement

बेस्टच्या अॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद


बेस्टच्या अॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
SHARES

ओला, उबेर, एम इंडिकेटर (M-Indicator) अॅप यांसारख्या मोबाइल अॅपमुळं प्रवाशांना ओला, उबेर टॅक्सी, बस, लोकल, मेल आणि एक्सप्रेस यांची माहिती एका क्लिकवर मिळते. त्यानुसार आता मुंबईतील बेस्ट प्रवाशांनाही बेस्ट बसची माहिती एका क्लिकवर मिळते आहे. यासाठी बेस्ट उपक्रमानं ‘BEST प्रवास' हे अॅप प्रवाशांच्या सेवेत दाखल केलं. या बेस्ट अॅपला आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिची बेस्ट प्रशासनानं दिली आहे.

ट्रॅफिकमुळं किंवा रस्त्यांवरील इतर कामांमुळं अनेकदा आपली बस कुठपर्यंत पोहोचली आहे, याचा आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळं अनेकदा आपली निश्चित बस चुकते आणि तासनतास एखाद्या मर्यादित बसची आपल्याला प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळं आपल्याला ज्या बसमधून प्रवास करायचा आहे, त्याची इत्यंभूत माहिती या बेस्ट अॅप द्वारे प्रवाशांना मिळत आहे.

बेस्ट प्रवासबरोबरच प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात. प्रवासादरम्यान प्रवाशांचे ड्रायवर व कंडक्टरसोबत वाद होतात. तसंच, थांब्यावर बस वेळेत आली नाही. तर यासाठी तक्रार दाखल करण्याचा पर्यायही बेस्टनं या अॅपमध्ये उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायाच्या माध्यमातून अनेक प्रवासी तक्रार करत आहेत. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

‘BEST प्रवास' हा अॅप प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी प्रवाशांना एम इंडिकेटर (M-Indicator) अॅपच्या माध्यमातून बेस्ट बसबाबत माहिती मिळत होती. मात्र या अॅपमध्ये केवळ बस मार्ग, कोणती बस कुठं जाणार, बस थांब्याच माहिती तसंच, एका डेपोतून बस कधी सुटणार आणि दुसऱ्या डेपोत पोहचणार याबाबत माहिती उपलब्ध होत होती. परंतु बेस्ट प्रवास अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना सगळ्यात महत्वाची म्हणजे 'नेमकी बस कुठं आहे', 'बस कुठ पोहोचली, किती वेळ लागणार, बसच्या सेवेबाबत तक्रार, चालक व कंडक्टरबाबत तक्रार यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


या पर्यायांमुळं बेस्ट प्रवासी मोठ्या प्रमाणात या अॅपचा वापर करत असल्याचं चित्र सध्या आहे. ‘BEST प्रवास' अॅप हे ९ सप्टेंबर रोजी लॉंच झालं असून, अवघ्या अडीच महिन्यात यूजर्सची संख्या १ लाखाच्या वर गेली आहे. एक लाखाहून अधिक जणांनी हे अॅप डाऊनलोड केल्याची माहिती 'प्ले स्टोर'वरून देण्यात आली आहे. तसंच, 3.2 रेटींग या अॅपला मिळालेले आहेत.


बेस्टच्या ‘BEST प्रवास' या अॅपचं शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकार्पण केलं होतं. कुलाबा येथील बेस्ट भवन इथं हा सोहळा पार पडला असून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत,मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांसह अनेक नेते उपस्थित होते. तसंच, बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. बेस्टचं हे अॅप 'इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम' (आयटीएमएस) या प्रकल्पाचा एक भाग असून, या प्रकल्पाची किंमत ११२ कोटी रुपये आहे.



हेही वाचा -

'हा' रेल्वे प्रकल्प महागला, प्रवासी नाराज

बीकेसी कनेक्टर वरून बेस्टच्या २०० बसफेऱ्या?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा