Advertisement

coronavirus : लॉकडाऊनमध्ये Google Maps दाखवणार मार्ग

अत्यावश्यक सेवा डिलिव्हरीद्वारे मागवण्यासाठी गुगल मॅप्सनं खास फीचर युजर्ससाठी आणले आहे.

coronavirus : लॉकडाऊनमध्ये Google Maps दाखवणार मार्ग
SHARES

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे. डिलिव्हरी सर्व्हिसेज देखील काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा डिलिव्हरीद्वारे मागवण्यासाठी गुगल मॅप्सनं खास फीचर युजर्ससाठी आणले आहे.

गुगल मॅप्सवर युजर्सला आजुबाजूच्या मार्केटचे टेकवे (Takeaway) आणि डिलिव्हरी (Delivery) फीचर दिसत आहे. याच्या मदतीनं युजर सहज फूड ऑर्डर करू शकतात. याशिवाय फुड शेल्टर आणि रात्री राहण्यासाठी जागा शोधू शकता.

मॅप्स उघडल्यावर रेस्टोरेंट, गॅस स्टेशन्स आणि कॉफी शॉप्सप्रमाणेच हे फीचर युजर्सला सर्च बारच्या खाली दिसतील. मॅप्सवर हे फीचर आधीपासूनच होते. मात्र आता शॉर्टकट्स म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात युजर्सला याचा फायदा होईल.

युजर्सला यामध्ये जे रेस्टोरेंट टेकवे आणि डिलिव्हरी पर्याय देत आहेत, त्यांची यादी दिसली. अ‍ॅपमध्येच युजर्स फूड ऑर्डर करू शकतात. जर तुम्ही रेस्टोरेंटपर्यंत जाऊ शकत असाल तर टेकवे पर्याय निवडू शकता. मॅप्स उघडल्यावर युजर्सला कोव्हिड-19 ची देखील माहिती मिळेल.

यासाठी फक्त तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप्स असलं पाहिजे. गुगल मॅप्सवर फुड, शेल्टर, शॉप्स शोधण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगतोय त्या फॉलो करा.

  • तुमच्या मोबाईलवर असलेला Google Map ओपन करा.
  • त्यानंतर Search ओपशन्सवर क्लिक करा.
  • फुडसाठी तुम्हाला तुम्हाला तुमचा शहराचं नाव टाकायचं आहे.
  • जर तुम्हाला रात्री राहण्यासाठी निवारा पाहिजे तर त्यासाठी देखील शहराचं नाव टाकावं लागेल
  • वरील माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रिनवर पत्ता दर्शवला जाईल. तिथून तुम्ही फुड मागवू शकता.



हेही वाचा

खोटे मेसेज रोखण्यासाठी व्हॉट्सॲपची 'आयडियाची कल्पना'

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाकवच अॅप

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा