‘बिल्डिंग मॅपिंग’मुळे विझणार आग

  Pali Hill
  ‘बिल्डिंग मॅपिंग’मुळे विझणार आग
  मुंबई  -  

  मुंबई - इमारतींना लागणार्‍या आगींवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाने ‘बिल्डिंग मॅपिंग’ सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये मुंबईतील सर्व इमारतींच्या अग्निप्रतिबंधक यंत्रणांचा लेखाजोखा राहणार आहे. तसंच ज्या सोसायट्यांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना केल्या नाहीत, त्यांची माहिती अग्निशमन दलाला कळणार आहे. त्यामुळं संबंधित सोसायट्यांवर खटले दाखल करता येणार असल्याचं अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितलं.

  इमारत ज्या विभागात आहे त्याचे नाव, इमारतीचे नाव, इमारत किती मजली आहे, किती जुनी आहे, इमारतीत अग्निप्रतिबंधक योजना आहेत का? आणि त्या कधी बसवल्या या सर्वांचा लेखाजोखा या सॉफ्टवेअरमध्ये राहणार आहे. तसंच इमारत मेंटेनन्ससाठीचा ‘बी’ फॉर्म आणि इमारतीची एनओसीसुद्धा या सॉफ्टवेअरला लिंक करण्यात येणार आहे. इमारतीच्या तपासणीचा हा सर्व अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर जनतेसाठी सार्वजनिक करण्यात येणार असल्याचं रहांगदळे म्हणाले.
  ७० अधिकार्‍यांसाठी ७० मोबाईल
  इमारतीचे परीक्षण करण्यासाठी ७० अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलमध्येसुद्धा असेल. त्यामुळे इमारतीचं परीक्षण केल्यानंतर ज्या अग्निप्रतिबंधक योजना कार्यान्वित नसतील त्याचा फोटो काढून पुरावा म्हणून इमारत मॅपिंगच्या लिंकवर टाकली जाईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.