Advertisement

कोरोना रुग्णांना सुविधा पुरविण्यासाठी मध्य रेल्वेचा मेडी-बोट रोबोट तयार

कोरोना रुग्णांना हाताळण्यासाठी या रोबोटचं डिझाइन करण्यात आलं आहे

कोरोना रुग्णांना सुविधा पुरविण्यासाठी मध्य रेल्वेचा मेडी-बोट रोबोट तयार
SHARES

कोरोना योद्ध्यांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं एक नवा रोबोट तयार केला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या नेतृत्वाखाली परळ कार्यशाळेनं वैद्यकीय रोबोट जीवाका तयार केला आहे. या रोबोटमुळं रुग्णांची काळजी आणि अन्य देखरेख करण्यासाठी मदत होणार आहे. कोरोना रुग्णांना हाताळण्यासाठी या रोबोटचं डिझाइन करण्यात आलं आहे. ड्रोनस्टार्क आणि बीजीएन मेडटेक्स (इंडिया) प्रा.लि. यांच्या सहकार्यानं परळ कार्यशाळा लिमिटेडनं जिवाका या मेडी-बोटची संकल्पना आखली आणि डिझाइन केली आहे.

कोरोनाविरोधात सुरुवातीपासूनच मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेनं पुढाकार घेतला आहे. या रोबोटमध्ये रुग्णांचे द्विमार्ग संप्रेषण आणि व्हिडीओ कव्हरेज आहे. डॉक्टर रुग्णाशी बोलू शकतो आणि पडद्यावर रुग्ण पाहून व्हर्च्युअल तपासणी करू शकतो. जिवाकामध्ये इनबिल्ट डिव्हाइस असून, हे रुग्णाच्या तपमान, रक्तदाब, हृदयगती आणि ऑक्सिजन पातळीचं परीक्षण करतं. रुग्णाची व्हर्च्युअल तपासणी केल्यास डॉक्टर आणि पॅरामेडिक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात लक्षणीय घट होणार आहे.

जिवाकाकडे औषधाची पेटीही आहे, जी रुग्णाला नियमित औषधे देतात. एकदा पूर्ण तपासणी झाल्यावर आणि रुग्णाला औषध दिले गेले की, जिवाकाला पुन्हा निर्जंतुकीकरणासाठी त्याच्या डेकवर बोलावण्यात येईल आणि मग ते पुढच्या रुग्णासाठी आपोआप तयार होईल. या कार्यशाळेत यापूर्वी कोरोना योद्ध्यासाठी येथे मुखपट्ट्या, पीपीई कव्हरेल्स, सॅनिटायझर, ऑक्सिजन ट्रॉलीची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच रेल्वे डब्यांना कोरोना आयसोलेशन डब्यांमध्ये रूपांतरित केले आहे.

या रोबोटमुळं रुग्णांशी आरोग्य सेवकांचा संपर्क कमी होणार आहे. जिवाका रिमोट-कंट्रोल रोव्हर रुग्णांच्या बेडवर जाण्यासाठी चिन्हांकित ओळींचं अनुसरणही करू शकणार आहे. हे रक्तदाब मोजणं, ऑक्सिजन संपृक्तता पातळी, शरीराचं तापमान इत्यादींसारख्या रुग्णांची काळजी आणि देखरेखीशी संबंधित विविध क्रिया करण्यासाठी व्हर्च्युअल हेल्थकेअरचं कार्य करतं.हेही वाचा -

नॉनकोविड रुग्णांसाठी आता सहज उपलब्ध होणार रुग्णवाहिका

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू


संबंधित विषय
Advertisement