Advertisement

मोटोरोला कंपनीचा स्मार्ट टीव्ही लवकरच बाजारात


मोटोरोला कंपनीचा स्मार्ट टीव्ही लवकरच बाजारात
SHARES

जगभरात सध्या अनेक मोबाइल कंपन्या स्मार्ट टीव्ही बाजारात आणत आहेत. यामध्ये एमआय (MI) या कंपनीच्या टीव्हीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशातच आणखी एक मोबाइल कंपनी बाजारात स्मार्ट टीव्ही आणत आहेत. मोटोरोला असं कंपनीचं नाव असून ही कंपनी पहिल्यांदाच स्मार्ट टीव्ही बाजारात आणत आहे. एमआयच्या टीव्हीला बाजारात असलेली मागणी पाहता मोटोरोला कंपनीच्या नव्या स्मार्ट टीव्हीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ऑनलाईन विक्री

मोटोरोला कंपनीनं स्मार्ट टीव्हीची आकारानुसार किंमतही जाहीर केली आहे. या टीव्हीची ऑनलाईन विक्री होणार असून, फ्लिपकार्ट या वेबसाईटवर २९ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. भारतातील ग्राहकांना लक्षात घेऊन हा स्मार्ट टीव्ही तयार करण्यात आला असून, याची निर्मिती भारतात करण्यात आली आहे.

टीव्हीची किंमत

  • 32-inch HD: 13,999
  • 43-inch FHD: 24,999
  • 43-inch UHD: 29,999
  • 50-inch UHD: 33,999
  • 55-inch UHD: 39,999
  • 65-inch UHD: 64,999

स्मार्ट टीव्ही

भारतीय बाजारात पहिल्यांदाच लेनोवो कंपनी आपल्या मालकीचा मोटोरोला स्मार्ट टीव्ही विक्रीसाठी आणत आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन तंत्रज्ञानासह HDR10 अनुरुप आहेत. तसंच, यामध्ये डीटीएस ट्रू सौरऊंड आणि डॉल्बी ऑडिओ असलेले 30 डब्ल्यू फ्रंट फायरिंग स्पिकर्स आहेत. मोटोरोला स्मार्ट टीव्हीमध्ये 2.25 जीबी रॅम आणि 16 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे.



हेही वाचा -

या कलाकारांनी बांधल्या ‘साता जल्माच्या गाठी’

ओला-उबरमुळे बेस्टही संकटात- उद्धव ठाकरे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा