Advertisement

५०१ रुपयांमध्ये मिळणार जिओ फोन २


५०१ रुपयांमध्ये मिळणार जिओ फोन २
SHARES

रिलायन्स इंडस्ट्रीज़च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी महत्तवपूर्ण घोषणा करत जिओ मोबाइलची अद्ययावत अावृत्ती जिअो फोन २ लाँच केला अाहे. मागील वर्षीच्या सर्वसाधारण सभेत जिओ फोन लाँच करण्यात अाला होता. त्यानंतर  जिअो फोन २ मध्ये अद्ययावत फिचर्स देण्यात अाले अाहेत.


व्हाॅट्सअॅप, फेसबुक मिळणार

जिअो फोन २ मध्ये अाता व्हाॅट्सअॅप, फेसबुक अाणि यूट्युबची मजा घेता येणार अाहे. याशिवाय या फोनमध्ये व्हाॅईस कमांड असून या फोनची विक्री १५ अाॅगस्टपासून सुरू होणार अाहे.  हा फोन २९९९ रुपयांमध्ये मिळणार अाहे. याशिवाय जिओचा जुना फोन देऊन अाणि ५०१ रुपये भरून जिअो फोन २ मिळणार अाहे.


जिओ फोन २ चे फीचर्स

नवीन जिओ फोन २ मध्ये स्क्रीन व्यूइंगचा अनुभव मिळेल. हा फोन क्वॉर्टी कीपॅडसहीत असणार अाहे. तर या मध्ये २ सिम टाकता येणार असून यामध्ये एक मोठा मोनो स्पीकरही मिळले. मोठा की-बोर्ड, ४जी सपोर्ट, २.४ इंचचा डिस्प्ले, २००० एमएच ची बॅटरी, ५१२ एमबी रॅम, अाणि ४ जीबी स्टोरेज (जे १२८ जीबी पर्यंत वाढवू शकतो) अादी फीचर्स जिओ फोन २ मध्ये मिळणार अाहेत. याशिवाय या फोनमध्ये २ मेगापिक्सलचा रियर अाणि ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात अाला अाहे.


जियो गीगा फाइबर लाँच

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने जियो गीगा फाइबर (Jio Giga Fiber) नावाने ब्रॉडबँड सेवा सुरू केली अाहे. यामध्ये ग्राहकांना ६०० टीव्ही चॅनेलची मजा घेता येणार अाहे. 



हेही वाचा - 

आता गुगल देणार भारतातील पूरस्थितीची माहिती

हे आहेत व्हॉट्सअॅपचे ५ नवीन फिचर्स




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा