Advertisement

ऐन दिवाळीत जिओचा ग्राहकांना झटका; प्लॅन बदलला, इंटरनेटचा स्पीडही झाला कमी


ऐन दिवाळीत जिओचा ग्राहकांना झटका; प्लॅन बदलला, इंटरनेटचा स्पीडही झाला कमी
SHARES

'जिओ जी भर के' असे म्हणत ग्राहकांवर सवलतींचा पाऊस पाडत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या जिओने ऐन दिवाळीत ग्राहकांना झटका दिला आहे. रिलायन्स जिओने एकीकडे 399 रुपयांच्या प्लॅनचे दर वाढवले आहेत, तर दुसरीकडे इंटरनेटचा स्पीड चक्क निम्म्याने कमी केला आहे.

ग्राहकांच्या पसंतीस पडलेल्या रिलायन्स जिओच्या 399 च्या प्लॅनचे दर जिओने 15 टक्क्यांनी  वाढवले आहेत. त्यामुळे आता 399 एेवजी ग्राहकांना 459 रुपये मोजावे लागणार आहेत. 459 रुपयांच्या या रिचार्जमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट, कॉलिंग आणि मेसेजची सुविधा मिळणार आहे. तर प्लॅनची वैधता 84 दिवसांसाठी असेल. याच प्लॅनची या आधी वैधता 90 दिवसांची होती.

प्लॅनचे दर वाढवण्याबरोबरच जिओने इंटरनेटचा स्पीड कमी केला आहे. त्यानुसार आता प्रतिदिनाचे इंटरनेटचे लिमिट संपल्यानंतर वापरण्यात येणाऱ्या इंटरनेटचा स्पीड निम्म्याने कमी होणार आहे. पूर्वी हा स्पीड 127 kbps होता तिथे हा स्पीड आता 64 kbps करण्यात आला आहे. 399 च्या प्लॅनमध्ये हायस्पीड 1 जीबी इंटरनेट डेटा मिळत होता. तर डेटा लिमिट संपल्यानंतरही इंटरनेट अनलिमिटेड सुरू राहत होते. पण आता जिओने 1 जीबी इंटरनेटचा डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड निम्म्याने कमी केला आहे.



हेही वाचा

आता रिलायन्स जिओचा मोबाईल फुकट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा