Advertisement

जियो दिवाली धना धन...जियोचा दिवाळी बंपर धमाका


जियो दिवाली धना धन...जियोचा दिवाळी बंपर धमाका
SHARES

रिलायन्सच्या जियो टेलिकाॅमनं दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा धमाका उडवला आहे. दिवाळीची संधी लक्षात घेऊन जियोने ग्राहकांसाठी ‘जियो दिवाली धना धन’ आॅफरद्वारे १०० टक्के कॅशबॅक प्लान आणला आहे. प्रिपेड स्मार्टकार्ड ग्राहकांसाठी ही दिवाळीची विशेष भेट ठरणार आहे. 

मोफत इंटरनेट डेटाच्या माध्यमातून टेलिकाॅम क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या जियो टेलिकाॅमकडून दिवाळीतही धमाका होण्याची अपेक्षा होती. त्याप्रमाणे जियोने 100 कॅशबॅकची आॅफर दिली आहे. ही आॅफर १२ आॅक्टोबर ते १८ आॅक्टोबर दरम्यान असणार आहे. त्यानुसार ३९९ रूपयांचा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना जियो अॅपमध्ये ५० रुपयांचे ८ व्हाऊचर मिळतील. या व्हाऊचरचा वापर करून ग्राहकांना भविष्यात ३०९ रुपयांपेक्षा अधिकचा रिचार्ज किंवा ९१ रुपये वा त्यापेक्षा अधिकचा डेटा रिचार्ज करता येणार आहे. हे सर्व व्हाऊचर १५ नोव्हेंबरपर्यंत वापरता येतील.

३९९ रुपयांत तीन महिने आॅल अनलिमिटेड प्लानसह मोफत व्हाईस काॅलिंग, मोफत एसएमएस, रोमिंग आणि एसटीडी अशा या सेवा आहेत. या अंतर्गत दररोज १ जीबी डेटा वापरता येणार असून १ जीबी डेटा वापरल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होईल. ही आॅफर मर्यादीत कालावधीसाठी असणार असून हा अॅडव्हान्स रिचार्जही असणार आहे. त्यामुळे सर्वच ग्राहकांना या प्लानचा लाभ घेता येईल. सध्याच्या प्लानची मुदत संपल्यानंतरच अॅडव्हान्स रिचार्ज लागू होईल.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा