SHARE

टिवटिवाट करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. ट्वीटरनं शब्दमर्यादा वाढवून २८൦ अक्षरांची केली आहे. गेल्यावर्षी ट्वीटरनं ही शब्दमर्यादा १४൦ पर्यंत वाढवली होती. पण ती आता आणखीन वाढवून २८൦ अक्षरांची करण्यात आली आहे. ट्वीटरनं याची अधिकृत घोषणा केली आहे. यूजर्सना मोकळेपणानं आपलं मत मांडता यावं, यासाठी ही अक्षरमर्यादा वाढवण्यात आली आहे.अक्षरमर्यादा वाढवणार असल्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी ट्वीटरनं ठेवला होता. त्याविषयीच्या तांत्रिक बाबींची तपासणीही केली जात होती. अखेर आजपासून म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून २८൦ अक्षरमर्यादा लागू करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांच्याकडून २४൦ अक्षरांचे पहिले ट्वीट करण्यात आले होते. हा बदल लहानसा आहे. पण आमच्यासाठी हे पाऊल खूप मोठे आहे. यापूर्वी १४൦ शब्दांची मर्यादा होती. परंतु, लोकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही हे विचारपूर्वक बदल केले आहेत, असे ट्वीट जॅक डोर्सी यांनी केले.


ट्वीटरचे नवीन फीचर्स

शब्दांची मर्यादा वाढवण्यासोबतच ट्वीटरनं नवीन फीचर्स देखील आणले आहेत. मल्टी पार्ट ट्विट, टेक्स्ट ब्लॉकचे स्क्रिनशॉट या नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. पण जॅपनिज, कोरियन आणि चायनीज या भाषांना १४൦ शब्दांची मर्यादा असेल. कारण सामान्यपणे एक वाक्य म्हणजे त्यांचा एक शब्द होतो. त्यामुळे त्यांना १४൦ शब्द पुरेसे होतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


कहीं खुशी कहीं गम!

पण हा बदल सर्वांच्याच पचनी पडलेला दिसत नाही. अनेकांनी याचा विरोध केला आहे. तर काहींना ट्वीटरचे हे नवीन फीचर्स पसंत पडले आहे. #280characters हे ट्रेन्डमध्ये जरी असले, तरी अनेक यूजर्सनी ट्वीटरला ट्रोल देखील केले आहे.हेही वाचा

व्हॉट्सअॅपचं हे नवीन फीचर तुम्हाला माहीत आहे का?


संबंधित विषय
ताज्या बातम्या