Advertisement

बेस्टची मिनी एसी बस फायदेशीर

बेस्टनं तिकीट दरात कपात केल्यानं प्रवासी संख्येत १३ लाखांची भर पडली आहे.

बेस्टची मिनी एसी बस फायदेशीर
SHARES

मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन असलेल्या बेस्टची प्रवासी संख्या काही वर्षांपासून कपात होती. खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी परिस्थिती बेस्टवर आली आहे. त्यामुळं अशा परिस्थितीतुन बेस्टला बाहेर काढण्यासाठी व प्रवासी संख्या वाढविण्यासाठी बेस्टनं अनेक उपक्रम हाती घेतले. त्यामधील बेस्टच्या ताफ्यात बसची संख्या वाढविण्याचा आणि तिकीट दरात कपात हे निर्णय बेस्टला फायदेशीर ठरत आहे. बेस्टनं तिकीट दरात कपात केल्यानं प्रवासी संख्येत १३ लाखांची भर पडली आहे.

बेस्ट प्रशासनानं ९ जुलै २०१९ पासून भाडेकपात करत प्रवासी भाडे ५० टक्क्यांनी कमी करत मुंबईकरांना दिलासा दिला. स्वस्तात मस्त प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळं आता बेस्ट प्रवाशांच्या संख्येत मागील ७ महिन्यांत १३ लाख ७७ हजार प्रवाशांची (दररोजचे सरासरी) भर पडली आहे.

हेही वाचा - दादर ते केईएम नवी बेस्टसेवा, प्रवाशांना दिलासा

सध्या बेस्ट ५ किलोमीटरच्या साध्या प्रवासाकरिता ५ रुपये आणि वातानुकूलित प्रवासासाठी ६ रुपये भाडेआकारणी करते आहे. त्यामुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. भाडेकपातीआधी दररोज सरासरी १९ लाख २३ हजार प्रवासी बेस्टनं प्रवास करत होते. हीच संख्या भाडेकपातीनंतर जानेवारी २०२० पर्यंत सरासरी २९ लाख ५ हजारापर्यंत गेली.

बेस्टनं प्रवाशांची घटलेली संख्या वाढविण्यासाठी मिनी एसी बसची सेवा सुरू केली. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वातानुकूलित व विनावातानुकूलित मिनी बसगाड्या दाखल केल्या. या विनावाहक सेवा ‘पॉइंट टू पॉइंट’ दिल्या जात आहेत. यामुळं प्रवाशांचा वेळ वाचतो. ही सेवा नोव्हेंबर २०१९ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. त्यानंतर याचा विस्तार केला गेला.

हेही वाचा - भाडेकपतीनंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत १३ लाखांची भर

त्याशिवाय, या सेवेमुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत काही प्रमाणात भर पडल्याचा दावा बेस्टनं केला आहे. विनावाहक सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या दीड महिन्यातच ३५ हजारपेक्षा जास्त प्रवाशांची भर पडली. त्यात आणखी वाढ होऊन ती लाखभराच्या जवळपास पोहोचली आहे.

एकेकाळी प्रवासी संख्या कमी त्यात आणखी भर म्हणजे पुरेस उत्पन्न नाही. अशा परिस्थितीत प्रवासी संख्या वाढविण्यात बेस्टला सतत अपयश येत होतं. मात्र, मिनी बस सेवा सुरू केल्यानं बेस्टसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेस्टची मिनी एसी बसमधून कमी दरात आरमदायी प्रवास करायला मिळत असल्यानं प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

मुंबईत अनेक महत्वाच्या मार्गावर मिनी एसी बस धावत आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात मिनी एसी बस मुंबईच्या रस्त्यांवर धावू लागली. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास सव्वा पाचशे बसेस सुरू झाल्या आहेत. यामुळं प्रवाशी संख्येसोबतच बेस्ट ताफ्यातील बसची संख्याही वाढते आहे. 'मिनी एसी बस सुरू करण्यापूर्वी बेस्टची प्रवासी संख्या १९ लाख होती. मात्र, एसी बस सेवा सुरू झाल्यानंतर ती ३० लाखांच्यावर पोहोचली आहे', अशी माहिती बेस्ट प्रशासनानं दिली.



हेही वाचा -

वीर सावरकरांचं देशासाठी मोठं योगदान- अजित पवार

मालमत्ता कराची २६४४ कोटींची थकबाकी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा