Advertisement

बेस्ट बसमधील मोबाईल चार्जर खराब, प्रवाशांची गैरसोय

मुंबईकरांची मोबाईल चार्जिंगची समस्या लक्षात घेत बेस्ट उपक्रमानं बसमध्ये मोबाईल चार्जिहसाठी यूएसबी पोर्टल लावलं आहे.

बेस्ट बसमधील मोबाईल चार्जर खराब, प्रवाशांची गैरसोय
SHARES

सध्यस्थितीत मोबाइल हा माणासांचा अविभाज्य घटक बनला आहे. जगातील सगळ्या घडामोडी मोबाइलमध्ये एका क्लिकवर उपलब्ध होतात. प्रवासावेळी देखील प्रवासी मोबाईलचा मनोरंजनासाठी वापर करतात. त्याशिवाय कामकाजानिमित्त सतत धावपळ करणाऱ्या मुंबईकरांचे अर्ध्याहून जास्त काम मोबाइलवरूनच होतं. मात्र, या कामादरम्यान मुंबईकरांना चिंता असते ती म्हणजे मोबाइलची बॅटरी संपण्याची. कारण बॅटरी संपल्यास काम अर्धवट राहतात. तसंच, मोबाइल चार्जिंगला लावे पर्यंत तातकाळत राहावं लागतं. त्यामुळं मुंबईकरांची ही समस्या लक्षात घेत बेस्ट उपक्रमानं बसमध्ये मोबाईल चार्जिहसाठी यूएसबी पोर्टल लावलं आहे.

टाटा मोटर्सकडून खरेदी

बेस्ट उपक्रमानं टाटा मोटर्सकडून अत्याधुनिक बसेसची खरेदी केली होती. या अत्याधुनिक बेस्ट बसेसचा लोकार्पण सोहळा २५ एप्रिल रोजी वडाळा बस डेपो येथे पार पडला. या बससेसचा लोकार्पण सोहळा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला होतं. दरम्यान, या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर अनेकांनी मोबाईल चार्ज करण्यासाठी यूएसबी पोर्टला वापर केल्याचं बेस्टनं सांगितलं. मात्र, सध्यस्थितीत या आत्यधुनिक बसमधील काही मोबाइल चार्जर पॉईंट बंद आहेत.

हेही वाचा - बेस्टमध्ये सौरऊर्जेचा वापर होण्यासाठी आॅनलाइन याचिका

प्रवाशांची गैससोय

मोबाइल चार्जर पॉईंट बंद असल्यानं प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैससोय होते. याबाबत बेस्टच्या एका अधिकाऱ्यानं कोणत्याही प्रवाशाला या अत्याधुनिक बसमधील मोबाइल चार्जर पॉईंट बंद आढळल्यास त्यांनी बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधण्याचं सांगितलं आहे. तसंच, यासाठी बेस्टनं प्रवाशांनी टोल फ्री नंबर (१८००२२७५५०) आणि ई-मेलची (transport@bestundertaking.com) सुविधा केली आहे. या टोल फ्री नंबर आणि इमेलवर मोबाईल चार्जर पॉईंट बंद असलेल्या संबंधित बसचा नंबरचा उल्लेख केल्यास त्याची दुरूस्ती करण्यात येईल, असंही सांगितलं.

हेही वाचा - अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाला बोनस

अत्याधुनिक सुविधा

  • बसमध्ये युरो - ४ इंजिन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन बसवण्यात आल्यामुळं बसचालकाला क्लचचा वापर करण्याची गरज नाही.
  • बसच्या पुढीच्या आणि मागच्या दरवाजाच्या पहिल्या पायरीची उंची कमी आणि दरवाज्याची रुंदी वाढवली गेली.
  • बसच्या मध्यभागी छताला मोठ्या क्षमतेची ब्लोअर सिस्टम बसवण्यात आली आहे.
  • बसची लांबी नेहमीपेक्षा अधिक १२ मीटर करण्यात आली आहे.
  • आसनांच्या बाजूला ८ मोबाईल चार्जर्स बसवण्यात आले आहेत.
  • प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळण्याकरता बसच्या पाठीमागे एअर सस्पेंशन बसवण्यात आलं आहे.
  • २ अासनांमधील अंतर वाढवण्यात आलं आहे.
  • बसच्या आतील भागात एलईडी ट्युबलाईट्समुळं बसमधील प्रकाशामध्ये सुधारणा तसंच, दिव्यांचं आयुर्मान वाढणार आहे.
  • बसच्या आतील छताला प्री कोडेट अल्युमिनियम पत्रे बसवण्यात आले आहेत.


हेही वाचा -

भाजपकडून शिवसेना आमदाराला ५० कोटींची आॅफर, वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सोनी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा