Advertisement

मुख्यमंत्र्यांना झाडू मारण्यासाठी चकाचक मंडईत टाकला कचरा


मुख्यमंत्र्यांना झाडू मारण्यासाठी चकाचक मंडईत टाकला कचरा
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेच्या 'स्वच्छता हीच सेवा' या मोहिमेच्या शुभारंभासाठी म. ज्योतिबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटमध्ये येणार असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंडई आणि आसपासचा परिसर चकाचक करून टाकला. पण स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभासाठी कचरा कुठे? असा जेव्हा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला तेव्हा चक्क या अधिकाऱ्यांनी पुन्हा गवताचा कचरा मंडईत आणून टाकत मुख्यमंत्र्यांना तेथे झाडू मारायला लावला. अधिकाऱ्यांनी टाकलेला हाच कचरा साफ करून आणि कचरा पेटीत भरून मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह सर्वांनी कॅमेरांचे फ्लॅश स्वत:वर मारून घेतले.

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत महापालिकेने १५ सप्टेंबर, २०१७ ते २ ऑक्टोबर, २०१७ दरम्यान ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान आयोजित केले आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म. ज्योतिबा फुले मंडई इमारतीत शुक्रवारी सकाळी झाला. ‘स्वच्छ् भारत अभियान’ अंतर्गत मुंबईत मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली असून स्वच्छतेबद्दल नागरिकांमध्ये तसेच स्थानिक स्वाराज्य संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून केंद्र शासनाने शहरांना क्रमांक देणे सुरू केले आहे. मुंबई शहराला प्रथम स्थास मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, तसेच प्रत्येक व्यक्तीने दिवसातील ५ ते १० मिनिटे स्वच्छतेसाठी द्यावीत, असे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या मोहिमेंतर्गत मुंबईतील उद्याने, आस्थापना स्वच्छ तर दिसतीलच, मात्र नागरिकांनीही ही उद्याने आणि मंडया कायमस्वरुपी स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

याप्रसंगी उद्योग मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, स्थानिक आमदार राज पुरोहित, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक, महापालिका आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) मनिषा म्हैसकर, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) विजय बालमवार, उप आयुक्त (महापालिका आयुक्त) रमेश पवार, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) सिराज अन्सारी, ‘स्वच्छ, मुंबई अभियान’चे समन्वयक आणि ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, सहायक आयुक्त (बाजार) संजय कुऱ्हाडे, बाजार आणि घनकचरा व्यवस्थापन खात्याचे संबंधित अधिकारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

 


हेही वाचा - 

सफाई कामगारांना द्या पौष्टीक आहार - मनसे

सचिन तेंडुलकर देवनार, शिवाजी नगरचा 'स्वच्छतादूत'



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा