भररस्त्यात मुंबईच्या बस स्टाॅपवर त्याने घेतला गळफास, मुंबईतील धक्कादायक प्रकार

मुंबईच्या नागपाडा येथील सेंट अँन्थोनी शाळेजवळील बेस्ट बस स्टाँपवर एका ४५ वर्षीय व्यक्तीने कापडाच्या सहाय्याने गळफास घेतला

भररस्त्यात मुंबईच्या बस स्टाॅपवर त्याने घेतला गळफास, मुंबईतील धक्कादायक प्रकार
SHARES

मुंबईच्या बेस्टच्या बस स्टाॅपवर एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचाः- विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!

मुंबईच्या नागपाडा येथील सेंट अॅन्थोनी शाळेजवळील बेस्ट बस स्टाॅपवर एका ४५ वर्षीय व्यक्तीने कापडाच्या सहाय्याने गळफास घेतला होता. सकाळी ६.३० च्या सुमारास त्या व्यक्तीला रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पाहून पोलिसांना पाचरण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या केलेल्या त्या व्यक्तीची पोलिसांनी झडती घेतली. मात्र त्याच्या खिशात काहीही न आढळून आल्याने त्याची ओळख पटली नाही. पोलिसांनी त्याला शवविच्छेदनासाठी जवळच्या जे.जे. रुग्णालयात नेले. पहाटेच या व्यक्तीने गळफास घेतला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याच्या या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा