Advertisement

Parle G नंतर लॉकडाऊनमध्ये मॅगीची रेकॉर्ड ब्रेक विक्री

Parle G नंतर नेस्लेच्या मॅगीनं (Maggi) जोरदार विक्री करून रेकॉर्ड नोंदवला आहे.

Parle G नंतर लॉकडाऊनमध्ये मॅगीची रेकॉर्ड ब्रेक विक्री
SHARES

कोरोना संकटामुळे जगातील अनेक उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. पण असं असलं तरी काही फुड कंपन्यांना लॉकडाऊनमध्ये चांगलाच फायदा झाला आहे. नुकतंच Parle G कंपनीनं त्यांचे विक्रिचे सर्व रेकॉर्ड तोडले. Parle G नंतर नेस्लेच्या मॅगीनं (Maggi) जोरदार विक्री करून रेकॉर्ड नोंदवला आहे.

लॉकडाऊनच्या (Lockdown in Mumbai) काळात मॅगीची विक्री तब्बल २५ टक्के वाढली. २५ मार्च पासून देशात लॉक डाऊन लागू झाला आणि १ जून पासून अनलॉकची सुरवात झाली. ८ जून पासून हॉटेल्स, रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी मिळाली. मात्र या काळात लाखो लोकांनी नाश्ता, रात्रीचे जेवण म्हणून मॅगीला पसंती दिली असल्याचं वाढलेल्या विक्रीवरून स्पष्ट झालं आहे.

गेले दोन महिने हॉटेल्स रेस्टॉरंट बंद असल्याने कामानिमित्ताने बाहेर जेवावे लागणारे तसेच शिक्षणानिमित्त घराबाहेर राहिलेले विद्यार्थी याना मॅगी हा एक चांगला ऑप्शन ठरल्याचे समजते. नेस्ले इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायण म्हणाले या काळात आमच्या सर्व पाची कारखान्याचे उत्पादन वेगाने वाढवावे लागले.

मॅगीची वर्षाची सरासरी उलाढाल १२ हजार कोटींची आहे. यावर्षी त्यात नक्कीच चांगली वाढ नोंदविली जाणार आहे. ताज्या अहवालानुसार चार वर्षानंतर म्हणजे २०१९ मध्ये मॅगीच्या विक्रीत पूर्वीपेक्षा अधिक वाढ झाल्याचं म्हटलं आहे.

२०१५ मध्ये मॅगी वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि मॅगीमध्ये शिशे प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याचे दिसून आल्यानं मॅगीवर बंदी घातली गेली होती. बंदीपूर्वी २०१४ मध्ये मॅगीची एकूण विक्री २.५४ मेट्रिक टन होती. लॉकडाऊनच्या काळात दोन महिन्यात ३.६४ मेट्रिक टनावर गेली आहे. या काळात कंपनीची उलाढाल ३५०० कोटींवर असून बाजारात या क्षेत्रात ८० टक्के हिस्सा मॅगीचा आहे.



हेही वाचा

लॉकडाऊनमध्ये Parle-G ची रेकॉर्ड ब्रेक विक्री

फ्लिपकार्टची फ्लाईट बुकिंग सेवा सुरू, 'अशी' करा फ्री ट्रिप

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा