Advertisement

'इथं' प्राण्यांच्या विष्ठेपासून बनते कॉफी


'इथं' प्राण्यांच्या विष्ठेपासून बनते कॉफी
SHARES

कॉफी म्हणजे अनेकांचा विक पॉईंटच. कॉफीचा एक घोट घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. उन्हाळा असो पावसाळा असो वा हिवाळा असो कॉफी तो मंगता है बॉस... हल्ली तर एकमेकांसोबत वेळ घालवता यावा म्हणूनही कॉफीची निवड केली जाते. म्हणूनच कॉफी आऊटलेट्स आणि कॉफीचे फुरके घेणारे कॉफी प्रेमी दोन्हीत वाढ झाली आहे. अशा ह्या तरतरी आणणाऱ्या कॉफीची निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातील तिसरा मोठा देश आहे. पण सर्वांची प्रिय अशी कॉफी निर्यात करणारा भारत हा पहिला देश नाही. अनेक देशांमध्ये कॉफी बनवण्याची पद्धत फार विचित्र आहे.


कॉफी ही बियांपासून बनते. त्यात विचित्र असं काय? असं तुम्हाला वाटत असेल. पण इथंच तर गडबड आहे. कारण आम्ही अशा कॉफी तुम्हाला सांगणार आहोत ज्या प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवल्या जातात. हे ऐकल्यावर अनेकांनी तोंडं वाकडं केली असतील. तुम्हाला अशा पद्धतीची कॉफी आवडली नसेल. पण अशा विचित्र पद्धतीनं बनवण्यात येणाऱ्या कॉफीचा चाहता वर्ग देखील आहे. विश्वास नसेल बसत पण हे खरं आहे. आणि या महागड्या कॉफीसाठी अनेक जण मोठी किंमतही चुकवायला तयार असतात.


१) ब्लॅक आयव्हरी ब्लँड कॉफी

उत्तर थायलंडमध्ये बनवण्यात येणारी ब्लॅक आयव्हरी ब्लँड कॉफी ही हत्तीच्या विष्ठेपासून बनवण्यात येते. अशा प्रकारच्या कॉफीसाठी हत्तींना कॉफीचं फळ खायला दिलं जातं. हत्ती कॉफीचं फळ खाऊन ते पचवतात. त्यानंतर विष्ठा बाहेर टाकतात. या विष्ठेमधून कॉफीच्या बिया काढल्या जातात.



एक किलो कॉफी मिळवण्यासाठी हत्तीला ३३ किलो कॉफीची कच्ची फळं खायला दिली जातात. हत्तीचे प्रशिक्षित ट्रेनर हत्तीच्या विष्ठेतून बिया काढण्याचं काम करतात. बिया काढल्यानंतर त्या चांगल्या धुऊन साफ करून उन्हात सुकवल्या जातात. बिया सुकल्यानंतर याची पूर्ण पावडर बनवली जाते.


या कॉफीमध्ये कडूपणा अजिबात नसतो. कारण पचन क्रियेच्या दरम्यान हत्तीचे एन्जाइम कॉफीच्या प्रोटीनला तोडून टाकतेसर्वात महागडी अशी ही कॉफी आहे. याच्या एक किलो कॉफीची किंमत ११०० डॉलर म्हणजे ६७ हजार १०० इतकी आहे.


२) कोपी लुवाक

जगातील सर्वात महागड्या कॉफीमध्ये आणखी एका कॉफीचा समावेश होतो तो म्हणजे कोपी लुवाकचा. ही कॉफी इंडोनेशियात बनवण्यात येते. त्यामुळे इथं येणारे पर्यटक एकदा का होईना या कॉफीचा आस्वाद घेतात. इंडोनेशियातील पाम सिवेट या एका मांजरीच्या प्रजातीच्या मदतीनं ही जगातील सर्वात महागडी कॉफी बनवण्यात येते.


ही कॉफी बनवण्यासाठी पाम सिवेट मांजर पाळली जाते. या प्राण्याला कॉफी बेरी खायला दिल्या जातात. पण पाम सिवेट कॉफी बिन्स पचवू शकत नाही. त्यामुळे या बिन्स विष्ठेच्या माध्यमातून बाहेर फेकल्या जातातया बियांना सुकवून आणि भाजून त्याची कॉफी बनवली जातेकोपी लुवाक ही कॉफी दुर्मिळ तर आहेचशिवाय ती प्रचंड महाग आहेप्रति किलो ७०० अमेरिकन डॉलर म्हणजे ४५ हजार ५३१ एवढी याची किंमत आहे.



कॉफीचा इतिहास

मुळात कॉफी ही इथोपियाच्या डोंगराळ प्रदेशातील मानली जाते. अशी आख्यायिका आहे की, इथोपिया इथला एक गुराखी आपली गुरे आणि बकऱ्यांना जंगलात चरायला नेत असे. त्याच्याकडील बकऱ्या एका विशिष्ट फळाच्या झाडाशी जाऊन लालसर फळ खात असत. ते फळ खाल्ल्यावर त्यांच्यात वेगळा उत्साह निर्माण होतो, अस गुराख्याला जाणवलं. त्यानं देखील हे फळ खाऊन पाहिले. पण या फळाचा आस्वाद त्याला कडवट जाणवला. त्यानं काही फळं जमा करून पाण्यामध्ये उकळून एक पेय बनवले आणि अरबीमध्ये याचे नाव कहवा असं ठेवलं. कहवा या शब्दाचा अर्थ उत्तेजना निर्माण करणारं पेय असा आहे. इथून पुढे कॉफी जगभर प्रसिद्ध झाली.



हेही वाचा

स्टारबक्सची 'ही' कॉफी बनायला लागतात ४८ तास

कॉफीतून प्या तुमचा फोटो! सेल्फिचिनोमध्ये हे शक्य आहे!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा