Advertisement

उन्हाळ्यात 'या' भाज्यांचे सेवन ठरेल फायदेशीर

प्रत्येक ऋतूनुसार आहार घेणं फार महत्त्वाचं आहे. निसर्गाची रचना देखील त्यानुसारच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कसा आहार घेतला पाहिजे खासकरून कुठल्या भाज्यांचं सेवन केलं पाहिजे हे आम्ही सांगणार आहोत. जेणेकरून या भाज्यांच्या सेवनानं तुमचा उन्हाळा सुखकर तर जाईलच. शिवाय वातावरणात कितीही उकाडा का असेना, पण तुमच्या शरीराला थंडावा जाणवेल.

उन्हाळ्यात 'या' भाज्यांचे सेवन ठरेल फायदेशीर
SHARES

एप्रिल-मे महिन्यात सूर्य चांगलाच तापलेला असतो. दुपारी घरातून बाहेर पडणं देखील नकोसं होऊन जातं. अशा उष्ण वातावरणात आजारी पडायची शक्यता पण अधिक असते. पण तुम्ही आरोग्याची योग्य काळजी घेतली, तर उन्हाळा तुम्हाला बाधणार नाही. यासाठी तुमचं खाणं-पिणं योग्य असणं आवश्यक आहे. खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या असतील तर काही टेंशन घेण्याचं कारण नाही. 

प्रत्येक ऋतूनुसार आहार घेणं फार महत्त्वाचं आहे. निसर्गाची रचना देखील त्यानुसारच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कसा आहार घेतला पाहिजे खासकरून कुठल्या भाज्यांचं सेवन केलं पाहिजे हे आम्ही सांगणार आहोत. जेणेकरून या भाज्यांच्या सेवनानं तुमचा उन्हाळा सुखकर तर जाईलच. शिवाय वातावरणात कितीही उकाडा का असेना, पण तुमच्या शरीराला थंडावा जाणवेल.


1) दुधी भोपळा

लांबट बाटलीच्या आकाराची फिक्या हिरवट रंगाची, आतून पांढऱ्या स्पंजासारखी आणि लांब चौकोनी बियांची ही फळभाजी आरोग्यसाठी उपयुक्त आहे. दुधीमध्ये ९६ टक्के पाणी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात दुधी भोपळा खाल्ल्यास फायदेशीर ठरतं. दुधाइतकेच पोषक घटक दुधीमध्ये असल्याने त्याला दुधी भोपळा असं नाव पडलं. 



लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्व, खनिजे, आद्रता, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यात असतात. याशिवाय दुधी हा पित्तनाशक, कफनाशक आणि बलकारक देखील आहे. उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत असल्यास दुधीच्या रसात खडीसाखर घालावी आणि त्याचे सेवन करावं. (दुधीचा रस कडू लागल्यास त्याने सेवन करू नका.) उष्णतेचा त्रास होत असेल तर नियमित दुधीचे सेवन करावे. यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होईल. नेहमी कोवळा दुधी भोपळा वापरावा.

इंग्रजी नाव – बॉटल गार्ड
शास्त्रीय नाव – कुकर बीटा मॅक्झिमा


2) कैरी

उन्हाळ्यामध्ये कैरी आणि आंब्याचा सीजन सुरू होतो. कैरीचं सेवन करण्यासाठी खरंतर हाच योग्य काळ आहे. आंबा खायला जसा सर्वांना आवडतो तसंच कैरी खायला देखील आवडतं. कैरीची भाजी, चटणी किंवा पन्हं बनवून त्याचं सेवन करू शकता. थोडीशी आंबट असणारी कैरी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कैरी ही थंड प्रकृतीची असते. 



पिंपल्स, उष्माघात, अपचनाची समस्या यासाठी कैरी उपयुक्त आहे. या दिवसांत घाम खूप येत असल्यानं शरीरातील क्षार घामावाटे निघून जातात. त्यामुळे थकवा जाणवतो. कैरीत सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असल्यामुळे क्षारांची परिपूर्ती होते. शिवाय कैरीत मॅग्नेशियम असतं. ते स्नायू शिशिल करण्याचं काम करतं. कैरीत सी आणि के ही जीवनसत्वे आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.



3) लाल भोपळा

चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असं म्हणणाऱ्या आजीबाईची गोष्ट तर सर्वांनाच माहीत असेल. लहानपणी सर्वांनीच भोपळ्याची ही गोष्ट ऐकली असेलच. पण लाल भोपळ्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? लाल भोपळ्यामध्ये पोटॅशियम आणि फायबरचं प्रमाण अधिक असते. त्यामुळे ब्लड प्रेशर आणि शूगरचा त्रास असणाऱ्यांसाठी लाल भोपळा फायदेशीर आहे. 



उन्हाळ्यात शरीराला खाज किंवा पित्ताचा त्रास होतो. असा वेळी लाल भोपळ्याचे सेवन करणं फायदेशीर आहे. त्वचेच्या आजारांमध्ये लाल भोपळ्याचं सेवन करावं. भोपळ्यामध्ये ९२ टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे भोपळ्याच्या सेवनानं तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते.

शास्त्रीय नाव - क्युकोरबिटा मॅक्जिमा

इंग्रजी नाव – रेड पमकिन


4) कारले

कारलं हे नाव वाचूनच अनेकांच्या कपाळाला आठ्या पडल्या असतील. कारल्याची चव बहुतांश लोकांना आवडत नाही. पण कारल्याचे अनेक फायदे आहेत. कारल्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, फास्फाॅरस आणि विटामिन हे गुणधर्म आहेत. 



याशिवाय कारलं थंड आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. पित्त, त्वचारोग, बद्धकोष्ठता आणि मधुमेह या आजारांमध्ये कारले उपयुक्त आहे. लाल भोपळ्याच्या सेवनानं डोळ्याचं आरोग्य चागलं राहतं. भोपळ्याच्या बियांमध्येही प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्वांचा साठा असतो.

शास्त्रीय नाव – कॅरेंशिया
इंग्रजी नाव – बिटर गूर्ड


5) पालक

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पालेभाज्या उपयुक्त असतात. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते. पालकामध्ये लोहे, कॅल्शिअम, फॉस्फरस तसंच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, अ, ब आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.

 


आयुर्वेदानुसार पालक ही शितल, वायुकारक, पित्तनाशक असते. या सर्व गुणधर्मामुळे पालकाचे उन्हाळ्यात सेवन करणे फायदेशीर आहे.

शास्त्रीय नाव - स्पिनॅसिया एॅलेरेकिया
इंग्रजी नाव – स्पिनॅश



हेही वाचा-

जेवणातच नाही तर 'या' कारणांसाठी देखील तमालपत्र फायदेशीर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा