Advertisement

शिळी चपाती टाकून देण्याआधी हे वाचा

बारा ते चौदा तास आधी बनवण्यात आलेली चपाती ही हानीकारक नाही. पण त्यापेक्षा अधिक काळ ठेवलेल्या चपातीचं सेवन टाळलेलं उत्तम.

शिळी चपाती टाकून देण्याआधी हे वाचा
SHARES

अनेकदा रात्री शिल्लक राहिलेली चपाती टाकून दिली जाते. मात्र रात्रीची चपाती सकाळी कडक होते म्हणून नाईलाजानं ती टाकून दिली जाते. तसंच शिळे अन्न आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही या कारणास्तव देखील शिळ्या चपात्या टाकून दिल्या जातात. खरं तर बारा ते चौदा तास आधी बनवण्यात आलेली चपाती ही हानीकारक नाही. पण त्यापेक्षा अधिक काळ ठेवलेल्या चपातीचं सेवन टाळलेलं उत्तम. पण बारा ते चौदा तासाहून अधिक चपातीचं सेवन करायचे काय फायदे असू शकतात त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


१) ताज्या चपातीपेक्षा शिळी चपाती हेल्दी आहे. शिळ्या चपातीमध्ये अनेक पोषणमुल्ये देखील समाविष्ट असतात. यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक ती उर्जा ताबडतोब मिळते. तसंच शिळ्या चपातीपासून कमी वेळात तुम्ही बरंच काही बनवू शकता.

२) अॅसिडीटी, गॅस आणि पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी शिळी चपाती खावी. गव्हाच्या पोळीमध्ये असणारे फायबर अन्न पचनासाठी देखील उपयुक्त आहे. रोज व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीचे काम करणाऱ्यांनी शिळ्या चपातीचं सेवन करावं. यामुळे शरीराला त्वरीत उर्जा मिळते.

३) ब्लड प्रेशरच्या समस्येनं त्रस्त असाल तर शिळ्या चपातीला थंड दुधात १५ मिनिटं भिजवून खावं. याशिवाय उन्हाळ्यात शिळी दुधात भिजवून खाल्ल्यानं उष्माघाताचं त्रास कमी होतो.

४) शिळ्या चपातीचे सेवन मधुमेह असलेल्यांनी देखील करावं. मधुमेही व्यक्तींनी सकाळच्या नाश्त्यामध्ये शिळी पोळी कुस्करून त्यात थंड दुध घालून खावं. पण साखर टाळावी.

५) अशक्तपणा जाणवत असेल तर शिळ्या चपातीचे सेवन करावे. यामुळे शरीरात शक्ती येईल.



हेही वाचा

दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणापासून 'असा' करा बचाव

मासिक पाळी दरम्यान वेदना असह्य होतात? मग हे उपाय करा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा