Advertisement

दोरीच्या उड्या मारा आणि झटपट वजन कमी करा


दोरीच्या उड्या मारा आणि झटपट वजन कमी करा
SHARES

आरोग्य राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण तासनतास जीममध्ये घाम गाळतो. पण जिममध्ये जाऊन व्यायाम करणं सर्वांनाच काही शक्य नसतं. कुणाकडे जास्त वेळ नसतो तर कुणाला जिमसाठी जास्त पैसे घालायचे नसतात. अशावेळी आम्ही तुम्हाला असा एक व्यायाम प्रकार सांगणार आहोत जो जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा कित्येक पटीनं चांगला आहे. हा व्यायाम प्रकार म्हणजे दोरीच्या उड्या.

दोरीच्या उड्या असा व्यायाम प्रकार आहे ज्यामध्ये तुमच्या प्रत्येक अवयवांचा व्यायाम होतो आणि कॅलरीज जळण्यास मदत होते. त्यामुळे दोरीच्या उड्या मारणं सर्वोत्तम व्यायाम आहे. विशेष म्हणजे या व्यायामासाठी जागा, विशेष खर्च, खूप जास्त वेळ असे काहीच लागत नसल्यानं तो कोणालाही सहज करता येऊ शकतो. दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे समजले तर तुम्ही नियमित दोरीच्या उड्या माराल.


दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे

) १५ मिनिटं सलग दोरीच्या उड्या मारणं हे २० मिनिटं पळण्याइतकं परिणामकारक आहे. दोरीच्या उड्या मारल्यानं एक मिनिटात तुम्ही १० ते २६ कॅलरीज बर्न करू शकतात.

) दोरीच्या उड्या मारल्यानं हाडं मजबूत होतात. शिवाय लय, रणनिती आणि संचालन या तिन्ही गोष्टींचा ताळेमळ योग्य बसतो.

३) दोरीच्या उड्या मारल्यानं वजन कमी करण्यास मदत होते. रोज अर्धा तास दोरीच्या उड्या मारल्यानं ५०० ग्रॅम वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे नियमित व्यायाम प्रकारांमध्ये दोरीच्या उड्यांचा समावेश असावा.

४) पहिल्या दिवशी दोरीच्या उड्या मारल्यानं पाय आणि मांड्या काही दिवस दुखतात. कारण अनेक दिवस व्यायाम न केल्यानं स्नायू सुस्त होतात. त्यामुळे हळूहळू दोरीच्या उड्या मारण्याची संख्या आणि वेळ दोन्ही वाढवावी. जेणेकरून पायांचे स्नायू बळकट होतील.

५) दोरीच्या उड्या मारल्यानं श्वासोश्वास घोण्याची क्रिया जलद होते. त्यामुळे फुफ्फुस तंदरुस्त होते.

६) दोरीच्या उड्या मारताना श्वासोश्वासादरम्यान पोट आत बाहेर होते. तसंच उड्या मारल्यानं पोट वायब्रेट होते. त्यामुळे पोटावरची चरबी कमी होते.

७) शारीरिक संतुलन वाढते

८) दोरीच्या उड्या मारल्यानं पूर्ण शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. खांदे, हात, पाय, पोट, स्नायू, हृदय अशा सर्व अवयवांचा चांगला व्यायाम होतो.


दोरीच्या उड्या मारताना हे नियम पाळावेत

१) दोरीच्या मारण्यापूर्वी वॉर्मअप करा. वॉर्मअप केल्याशिवाय उड्या मारल्यात तर शरीर दुखू शकते.

२) दोरीच्या उड्या मारताना आधी हळू-हळू उड्या मारा. दुसऱ्या मिनिटानंतर तुम्ही जोरानं उड्या मारू शकता.

३) दोरीच्या उड्या मारल्यानंतर पाच मिनिटं आराम करा किंवा शवासनात पडून राहा.

४) अर्धा तासानंतर हलका आहार घ्या. मोड आलेले कडधान्य, सफरचंद, केळी, दूध किंवा लिंबू पाणी यांचा आहारात समावेश असावा.


दोरीच्या उड्या यांनी मारू नयेत

१) उच्च रक्तदाबाचा आजार असलेल्यांनी दोरीच्या उड्या मारू नयेत.

२) बाळंतपणानंतर तीन महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हा व्यायाम करावा.



हेही वाचा

पुश-अप्स मारताना करू नका या ९ चुका

'हे' ७ व्यायाम प्रकार तुमचं आयुष्य करतील सुखकर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा