Advertisement

हिवाळ्यात अशी घ्या त्वचा आणि केसांची काळजी


हिवाळ्यात अशी घ्या त्वचा आणि केसांची काळजी
SHARES
दिवसेंदिवस पारा गोठू लागला आहे. हिवाळा सुरू झाला की आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडी आणि कोरडेपणाचा शरीरावर परिणाम होऊ लागतो. त्वचा बधीर झाल्यासारखी होते, ओठ, हात-पास, केस यांच्यावर या ऋतूत जास्त परिणाम होतो.  यासाठी हिवाळ्यात शरीराची कशी काळजी घ्यावी याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


त्वचेसाठी काय कराल?

1) त्वचेसाठी हानिकारक साबण वापरू नका. ऑलिव्ह ऑइल किंवा टी ऑइल असलेले साबणच विकत घ्या.

2) त्वचेसाठी मॉइश्चरायझर क्रिम वापरा.

3) चेहरा धुण्यासाठी क्लिनसरचा वापर करा.

4) ओठ फुटले असल्यास ओठांची सुकलेली त्वचा काढू नका. ओठांसाठी पेट्रोलियम जेली किंवा लिप बाम वापरा.
जास्त गरम पाण्यानं अंघोळ करू नका.

5) त्वचेसंदर्भात रोग असल्यास योग्य ते उपचार करा.

6) व्हिनेगरच्या वापरानं देखील हाता-पायातील खडबडीतपणा निघून जातो. व्हिनेगर लावल्यानंतर गरम पाण्यात हात भिजवा आणि ब्रशने हात-पाय घासा. यामुळे तुमचे हात आणि पाय खूप मुलायम होतील.

7) जर तुम्ही रोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल तर त्यानेही तुमचे हात खरखरीत होणार नाहीत. शरीरात योग्य प्रमाणात पाणी असलं की त्वचा नरम आणि मृदू राहते.

8) रात्री झोपताना हाताना आणि पायांना नारळाचे तेल लावून झोपा. यामुळे सकाळी उठल्यावर तुमचे हात-पाय मुलायम आणि खूप चमकदार होतील.

9) चेहऱ्यावरील डेड स्कीन काढण्यासाठी स्क्रब केले जाते. याचा फायदाही होतो. पायावरील आणि तळव्याची डेड स्कीन काढण्यासाठीही स्क्रब करावे. पायासाठी फूट स्क्रब बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहेत.

10) हिवाळ्यात पायांचा ओलावा टिकावा आणि पाय मऊ राहण्यासाठी मोज्यांचा वापर करता येईल. मोज्यांच्या नियमित वापराने तुमचे पाय थंड हवा आणि धुळीपासून सुरक्षित राहतील.


अशी घ्या केसांची काळजी

1) आठवड्यातून किमान तीन वेळा केस धुवा

2) अॅन्टी डँड्रफ शॅम्पू डोक्याला ४-५ मिनिटं लावून ठेवा आणि मग केस धुवा

3) कोरड्या केसांना धुतल्यानंतर तेल लावा

4) केस धुण्याच्या एक दिवस अगोदर केसांना तेल लावा.

5) केसांना ब्लो-ड्राय करणं टाळा

6) केसांसाठी सिरमचा वापर करा

7) हिवाळ्याच्या दिवसांत डोक्याची त्वचा कोरडी होत असते. त्यामुळे डोक्यात कोंडा होतो. यापासून सुटका करायची असेल तर गरम तेलामध्ये लिंबाचा एक चमचा रस मिसळून लावा. रात्री हे मिश्रण लावा आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुऊन काढा.

8) या दिवसांत केसात फार गुंता होत असतो. त्यासाठी विंटेज कंगवा वापरा. प्लास्टिक आणि प्राण्याच्या केसांपासून हा बनवला जातो.

9) थंडीमुळे केसांची चमक फिकी पडते. ती दूर करण्यासाठी केसांच्या मुळांना मध लावा. त्यानंतर केसांना एक तास टॉवेलने बांधून ठेवा. त्यानंतर केस धुऊन काढा. केस पुन्हा चमकतील.


हेही वाचा

धार्मिक विधीतच नाही तर आरोग्यसाठीही वापला जातो कापूर

शिळी चपाती टाकून देण्याआधी हे वाचा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा