Advertisement

उन्हाळ्यातही राहा 'कूल'


उन्हाळ्यातही राहा 'कूल'
SHARES

न्हाळ्यात घराबाहेर पडायचं म्हणजे जीव नकोसा होतो. अंगाची अक्षरश: काहिली होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ, गॉगल, छत्र्या यांचा आधार तर आपण घेतोच. पण तरीही उन्हाळ्यात अंगावरून ओघळणाऱ्या घामाच्या धारांना सहन करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. पण उन्हाळ्यात साजेसे कपडे घातल्यास उन्हाळा नक्कीच सुसह्य होऊ शकतो. नाही का? मात्र उन्हाळ्यात नेमके कुठले कपडे घालायचे? असा प्रश्नही अनेकांना पडू शकतो. तेव्हा डोंट वरी... तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही आहोत की. हा कडक उन्हाळा सहन होईल असे कोणते पर्याय कपड्यांमध्ये उपलब्ध आहेत? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.



उन्हाळ्यात कसे कपडे घालावेत?

  • उन्हाळ्यात कॉटनचे कपडे वापरणे उत्तमच.
  • कॉटनच्या कपड्यांची सवय नसेल तर तुम्ही टेरिकॉटचे कपडे ट्राय करू शकता
  • हेवी वर्क असलेले कपडे घालू नका. जाड आणि भरीव नक्षीकाम असलेले कपडे उन्हाळ्यात घालणं अधिक त्रासदायक ठरेल
  • उन्हाळ्यात सुटसुटीत कपडे घालावेतजास्त फिटिंगचे कपडे घातल्यानं अधिक त्रास होऊ शकतो
  • उन्हाळ्यात फिकट रंगांच्या कपड्यांना अधिक प्राधान्य द्यावंपांढऱ्या रंगांचे कपडे घातलेत, तर उत्तमच. कारण फिकट रंग सूर्यकिरण कमी प्रमाणात शोषून घेतात



उन्हाळ्यात फक्त कॉटनच नाही, तर इतर मटेरियलच्या कपड्यांचा देखील पर्याय उपलब्ध आहेत. नेमके कोणत्या मटेरियलचे कपडे उन्हाळ्यात घालणं सोईस्कर आहे हे पाहूया


खादी

उन्हाळ्यात सुसह्य ठरू शकेल, असा पहिला प्रकार म्हणजे खादीचे कपडे. थोडासा आऊट ऑफ फॅशन मानल्या जाणाऱ्या खादीकडे आता तरूणाई वळू लागली आहे. उन्हाळ्यात खादी हा उत्तम पर्याय आहेआंतरराष्ट्रीय पातळीवर हळूहळू खादीची ओळख निर्माण होऊ लागली आहेखादीमध्ये देखील फुलांच्या प्रिंटचेउभ्या रेघांचे, प्लेन आणि बरेच प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मुलींसाठी जीन्स टॉप, हाफ कुडता, लाँग कुडता, साड्या असे पर्याय उपलब्ध आहेतसाड्यांमध्ये पटोला, साऊथ इंडियन असा प्रकारच्या साड्यांचा समावेश आहे. मुलांसाठी रंगीत आणि टीपिकल डिझाईनचे शर्ट उपलब्ध आहे.



सुती

उन्हाळ्यात सुती म्हणजेच कॉटनच्या कपड्यांना अधिक मागणी असते. जीन्स टॉप, शॉर्ट आणि लाँग कुर्ता, वनपिस, साडी, मॅक्सी, स्कर्ट असे प्रकार कॉटनमध्ये पाहायला मिळतात. तर मुलांसाठी कॉटन प्रकारात शर्ट आणि कुर्ता हा पर्याय उपलब्ध आहे.



हेही वाचा : जुन्या साड्या पडून आहेत? नॉट टू वरी



शिफॉन

शिफॉन वजनाला हलका असलेला प्रकार आहे. यात फुलाफुलांच्या किंवा पोलका डॉट्सचे प्रिंट अधिक दिसतात.यात देखील फिके रंग उपलब्ध असतातजीन्सवरचे टॉप्स, स्कार्फ आणि साड्या अधिक प्रमाणात दिसतात.



चिकन

बारीक छिद्रांची प्रिंट, मुलायम आणि मुख्य म्हणजे सुताचा वापर आणि रिच लूक असल्यामुळे चिकनच्या कपड्याला महिलांची जास्त पसंती असते. छिद्राची डिझाईन असल्यामुळे यात अधिक गरम होत नाही. यात अधिक करून पंजाबी ड्रेस,कुडते आणि साड्या पाहायला मिळतात.मुलांसाठी यात फक्त कुडता हा प्रकार असतो.

कुर्ती, साड्या, टॉप्स या व्यतिरिक्त अनेक हटके ऑप्शन्स आहेत. ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. 

  • प्लाजो घालायला सुटसुटित तर आहेतच. यासोबतच त्या स्टायलिश देखील आहेत. तुम्ही ऑफिस वेअरसाठी तसंच पार्टी किंवा कुठे फिरायला जाण्यासाठी देखील प्लाजो घालू शकता. प्लाजोवर तुम्ही हलक्या रंगाचा एखादा टँक टॉप्स घालू शकता.



  • उन्हाळ्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे मॅक्सी. मॅक्सी सुटसुटीत असल्यानं तुम्हाला बांधल्यासारखं वाटणार नाही. कॉटन, मलमल या मटेरियलमध्ये मॅक्सी उपलब्ध असतात. 


  • शॉर्ट स्कर्ट देखील तुम्ही उन्हाळ्यात घालू शकता. 


  • शॉर्ट्स किंवा डंगरीज तुम्ही एखाद्या शर्ट किंवा क्रॉप चॉपसोबत घालू शकता. प्रिटेंड, डेनिम अशा टाईपमध्ये शॉर्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. 


हेहा वाचा

साईज कोणतीही असो..'या' ब्रॅण्डची हमखास कपड्यांची गॅरंटी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा