Advertisement

मंत्रालयात हाय अलर्ट!

मंत्रालयाच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर सामान्य प्रशासन विभाग आणि गृह विभागाची कार्यालये आहेत. या दोन्ही मजल्यांवर एखाद्या कक्षाबाहेर, कार्यालयाबाहेर एखादी व्यक्ती ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी असेल, तर संबंधित पोलिस त्या व्यक्तीजवळ जाऊन विचारपूस आणि चौकशी करण्याचं काम करतात.

मंत्रालयात हाय अलर्ट!
SHARES

'सध्या मंत्रालय म्हणजे आत्महत्यालय झालंय!', 'सुसाईड पॉईंट बनलाय' अशी वाक्ये, शब्द कानावर पडले तर आश्चर्य वाटायला नको. मंत्रालयाच्या सुरक्षेचे तर तीन तेरा वाजले असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या सगळ्या कारणांनी मंत्रालयात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. मंत्रालय परिसरात तर वर्दीतल्या पोलिसांचा पहारा आहेच. याशिवाय मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर, विशेषतः पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर साध्या वेशातील पोलिस तैनात असलेले पाहायला मिळतायत. आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्याचं काम पोलिसांमार्फत केलं जातंय.


पाचव्या-सहाव्या मजल्यावर चोख सुरक्षाव्यवस्था

मंत्रालयाच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर सामान्य प्रशासन विभाग आणि गृह विभागाची कार्यालये आहेत. या दोन्ही मजल्यांवर एखाद्या कक्षाबाहेर, कार्यालयाबाहेर एखादी व्यक्ती ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी असेल, तर संबंधित पोलिस त्या व्यक्तीजवळ जाऊन विचारपूस आणि चौकशी करण्याचं काम करतात. जर त्याला काही मदत हवी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत घेऊनही जातात.


पोलिसांची दमछाक

मंत्रालयात येऊन विषप्राशन करणे, गोंधळ घालणे, आत्मदहनाचा इशारादेणे, मंत्रालयावरून उडी मारणे असे प्रकार सध्या वाढले असून त्यातून तणाव निर्माण होतायत. त्यामुळे सध्या मंत्रालय म्हणजे अतिसंवेदनशील ठिकाण झाल्याने शासनाकडून ही काळजी घेतली जात असल्याचं कळतंय. मात्र यामुळे तैनात पोलिसांची मात्र मोठी दमछाक होतं असल्याचं चित्र ही पहायला मिळतंय. मंत्रालयातल्या सुरक्षेबाबत आम्ही आधीही काळजी घेतच होतो. मात्र, आता आमची पुरती दमछाक होत असल्याची प्रतिक्रिया एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.


सुरक्षा अद्ययावत होणार

मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बूम बॅरियर्स आणि बोलार्ड्स हे अत्याधुनिक फाटक बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेशद्वारातून येणा-या प्रत्येक वाहनाचं स्कॅनिंग करणं शक्य होणार आहे. यामध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरीष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिली आहे. 

सुरक्षा व्यवस्थेसाठी खासगी सल्लागार कंपनीकडून सल्ला घेतला जात असून यासाठी आधार नंबरची जोडणी करण्याचा सल्ला ही कंपनी देऊ शकते, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. मंत्रालयात राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या अभ्यागतांना जलद पास वितरित होण्यासाठी ओळखपत्रासाठी नवी अत्याधुनिक व्यवस्था राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या एका पासला लागणारा ६ ते १० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.



हेही वाचा

मंत्रालयाबाहेर तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा