ते अदृश्य हात कुणाचे - अनिल परब

 Mumbai
ते अदृश्य हात कुणाचे - अनिल परब
Mumbai  -  

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालामुळे विधान परिषदेत गुरुवारी सुनील तटकरे आणि शिवसेनेचे प्रतोद अनिल परब यांच्याच खडाजंगी पहायला मिळाली. मुंबई विद्यापीठाच्या निकालाला लागणारा उशीर यावर सभागृहात बोलताना तटकरे यांनी शिवसेना आत एक आणि बाहेर एक अशी दुट्टपी भूमिका कायम घेत असल्याचा आरोप केला. तटकरेंच्या या आरोपानंतर संतापलेले अनिल परब यांनी सुद्धा तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले अनिल परब -

तटकरे आमच्या भूमिकेवर शंका घेतात. पण मी सभागृहात शिक्षण मंत्र्याच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला, तेव्हा तुम्ही आक्षेप का घेतला, असा प्रश्न करत अनिल परब यांनी अदृश्य हात कुणाचे आहेत हे यावरून दिसून येतात', असे सांगत तटकरेंवर जोरदार टीका केली.

दरम्यान यावेळी मुंबई विद्यापीठीचे कुलगुरू यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी तटकरे यांनी केली, तसेच विद्यापीठाचे निकाल कधी लागाणार? आतापर्यंत किती पेपर तापसून झाले?, अशी विचारणा तटकरे यांनी केला. मात्र तटकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यानी देत कुलगुरूंवर कारवाईचे अधिकार राज्यपालांचे आहेत, राज्यापाल चौकशी करत असल्याची माहिती दिली.


हेही वाचा -

सत्तेबाहेरचा काळ माणसं ओळखायला शिकवणारा - सुनील तटकरे

अजबच! विरोधकांऐवजी सत्ताधाऱ्यांनीच केला सभात्याग


Loading Comments