Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

पेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी याचा भार ग्राहकांवर टाकला आहे.

पेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं
SHARES

पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल (petrol) आणि डिझेलचे (diesel) दर वाढवले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी याचा भार ग्राहकांवर टाकला आहे. शुक्रवारी देशभरात पेट्रोल २९ पैसे आणि डिझेल २८ पैशांनी महागलं आहे. 

पेट्रोल, डिझेलच्या दरांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. गुरुवारी इंधन दरवाढीला ब्रेक दिल्यानंतर शुक्रवारी पुन्हा भावात वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर आता मुंबईत (mumbai) पेट्रोल १०२.०४ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलचे दर ९४.१५ रुपये प्रति लिटरवर गेले आहेत.

दिल्लीत (delhi) पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे ९५.८५ आणि ८६.७५ रुपये झाला आहे. चेन्नईत (chennai) पेट्रोलचा भाव ९७.१९ रुपये आणि डिझेलचा दर ९१.४२ रुपयांवर गेला आहे.  कोलकात्यात (kolkata) एक लिटर पेट्रोल ९५.८० रुपयांना तर डिझेल  ८९.६० रुपयांना मिळत आहे. पुण्यात (pune) पेट्रोलचा भाव १०१.६४ रुपये झाला आहे. 

सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर ३२.९८ प्रतिलिटर तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. तर महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि डिझेलवर २१ टक्के व्हॅट लावते. तसंच यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवर ३ रुपये प्रतिलिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. 

मार्च महिन्यात १६ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग ४ दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. हेही वाचा -

पुढचे ३ दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा