एटीएमची हाफ सेंच्युरी

Mumbai
एटीएमची हाफ सेंच्युरी
एटीएमची हाफ सेंच्युरी
See all
मुंबई  -  

काळ झपाट्याने बदलतोय तसे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे प्रमाणही वाढतेय. बँकांचे ऑनलाईन पोर्टल्स आले, खासगी कंपन्यांचे मोबाईल वाॅलेट आले, क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल पेमेंटचे असंख्य पर्याय खुले झाले. पण भारतात `एटीएम`चे महत्त्व जराही कमी झालेले नाही.

एटीएम म्हणजे `एनी टाइम मनी` असाच फुलफॉर्म असल्याची अनेकांची समजूत असते. पण प्रत्यक्षात तसे नसून `ऑटोमॅटेड टेलर मशीन` असा फुलफॉर्म असणाऱ्या या एटीएमचे एवढे कोडकौतुक करण्याचे कारण काय? तर, त्यामागचे कारणही विशेष आहे. ते म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेले एटीएम चक्क पन्नाशीचे झाले आहे.

लहान-मोठ्या गरजांसाठी जेव्हा केव्हा आपल्याला रोख रकमेची गरज पडते. तेव्हा आपली पावले आपसूकच एटीएमच्या दिशेने वळतात. भलेही सरकार डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देत असली, तरी आजही पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर लांबच्या लांब रांगा लागतात. मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर तर अनेकांच्या मनात एटीएम म्हटले पैशांचा खडखडाट अशी उपहासात्मक छटाही उमटते.


लंडनच्या बार्क्लेज बँकेत पहिले एटीएम

पन्नास वर्षांपूर्वी म्हणजेच 27 जून 1967 मध्ये जगातील सर्वात पहिले 'एटीएम' मशीन लंडनच्या एन्फील्डमधील बार्क्लेज बँकेच्या शाखेत लावण्यात आले होते.


मुंबईत 'एचएसबीसी'चे पहिले एटीएम

भारतात 30 वर्षांपूर्वी 1987 मध्ये एचएसबीसी बँकेने मुंबईच्या शाखेत पहिले एटीएम लावले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत देशभरात एकूण 2 लाख 7 हजार 813 एटीएम मशीन्स लावण्यात आली आहेत.एसबीआयचे सर्वात जास्त एटीएम

देशात सर्वाधिक एटीएम स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)चे आहेत. 'एसबीआय'ने देशभरात 58 हजार 798 एटीएमचे जाळे विणले अाहे. तर 86 कोटींहून अधिक बँक ग्राहकांकडे एटीएम कम डेबिट कार्ड आहेत.


खासगी कंपन्यांचे एटीएम

रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2012 मध्ये 'व्हाईट लेबल' एटीएम बनवण्याची मंजुरी दिली. हे एटीएम बँका नव्हे, तर केवळ कंपन्याच लावू शकतात. ग्रामीण भागात एटीएम बसविण्याची सुविधा यामुळे निर्माण होते.

टाटा कम्युनिकेशनने 27 जून 2013 मध्ये ठाणे जिल्ह्यातील चंद्रपदा येथे भारतातील सर्वात पहिले एटीएम बसवले होते. या एटीएमला कंपनीने 'इंडिकॅश' असे नाव दिले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.