Advertisement

अल्पवयीन मुला-मुलींसाठी इन्स्टाग्रामचं नवं फिचर

इन्स्टाग्रामनं एक नवीन फिचर लाँच केले आहे ते म्हणजे सेस्निटिव्ह स्क्रिन. हे फिचर अल्पवयीन मुला-मुलींसाठी फायदेशीर ठरणार आहे.

अल्पवयीन मुला-मुलींसाठी इन्स्टाग्रामचं नवं फिचर
SHARES

कमी वेळेत तरूणाईच्या पसंतीस उतरणारं अॅप म्हणजे इन्स्टाग्राम... इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. यावेळी देखील इन्स्टाग्रामनं एक नवीन फिचर लाँच केले आहे ते म्हणजे 'सेस्निटिव्ह स्क्रिन'. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मुसेरी यांनी यासंबंधी घोषणा केली आहे.


अल्पवयीन मुलांसाठी फायदेशीर

भारतामध्ये इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील सहभाग आहे. अल्पवयीन मुला-मुलींचा विचार करूनच इन्स्टानं सेस्निटिव्ह स्क्रिन हे फिचर लाँच केलं आहे. अनेकदा इन्स्टाग्रामवर स्क्रोल करताना अश्लील फोटो, मेसेज, व्हिडीओ दिसतात. याचा अल्पवयीन मुलांवर प्रभाव पडत असून त्यांच्या हातून नकळत काही चुकिच्या गोष्टी घडत असल्याचं समोर येत आहे. या फिचरमुळे अश्लील फोटो, व्हिडीओ, थंबनेल्स युजर्सनं क्लिक करेपर्यंत ब्लर दिसणार आहेत. यामुळे अश्लील फोटो, मेसेज, व्हिडीओ या सर्वांपासून अल्पवयीन मुला-मुलींना अलिप्त ठेवण्यात मदत होणार आहे.

अशी सुचली अॅपची संकल्पना

नुकतंच ब्रिटनमधल्या एका अल्पवयीनं मुलीनं इन्स्टाग्रामवरील पोस्ट वाचून आत्महत्या केली. आत्महत्येला प्रवृत्त करणारा मजकूर वाचल्यानं मुलीनं आत्महत्या केल्याचा आरोप पालकांनी केला. या घटनेनंतर इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले. त्यानंतर इन्स्टाग्राममध्ये हा बदल करण्यात आला आहेहेही वाचा

व्हॉट्स अॅप युजर्सनो सावधान...

महिलांच्या सुरक्षेसाठी स्मार्टफोनचा स्मार्ट वापरRead this story in English
संबंधित विषय
Advertisement