Advertisement

मनातल्या गोष्टी ऐकणारं 'साराह' अॅप


मनातल्या गोष्टी ऐकणारं 'साराह' अॅप
SHARES

मनात तर भरपूर काही साचलंय, पण कसं व्यक्त होऊ कळतंच नाही. एखाद्या व्यक्तीला आपल्याला काही सांगायचं असतं किंवा त्याच्याशी मनमोकळेपणानं भांडायचं असतं. मात्र तसं केल्यावर समोरचा नाराज होईल, याची भीती सतत वाटत असते. समोरच्याला आपलं नाव कळलं तर त्याचा आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होईल, असंही सतत वाटत असतं. अशा भावनिक गुंतागुतीच्या जाळ्यात अडकलेल्या असंख्य व्यक्तींच्या मनावरचा ताण सध्या 'साराह अॅप' नावाचं अॅप दूर करतोय.

या अॅपने अत्यंत कमी कालावधीत मोबाइल अॅपच्या बाजारात आपली पकड मजबूत केली आहे. या अॅपच्या माध्यमातून आपण कुठल्याही व्यक्तीला आपलं नाव न सांगता मॅसेज पाठवू शकताे. अट फक्त एवढीच की हे अॅप समोरच्या व्यक्तीकडंही असलं पाहिजे.


का वाढतेय या अॅपची क्रेझ?

'साराह अॅप' वेबसाईट किंवा अॅपद्वारे कुठलीही व्यक्ती कुठलाही मॅसेज समोरच्या व्यक्तीला पाठवू शकते. या ऑनलाईन अॅप्लिकेशनद्वारे मॅसेज पाठविणाऱ्या व्यक्तीची ओळख मॅसेज प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला सांगितली जात नाही. अशा तऱ्हेने तुम्ही तुमचं नाव उघड न करताच समोरच्याशी संवाद साधू शकता. मनातलं खुलेपाणानं बोलू शकता.



असं वापरा हे अॅप

हे अॅप वापरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा 'साराह' प्रोफाईल बनवावं लागेल. 'साराह' अॉनलाईनवर जाऊन किंवा अॅप डाऊनलोड करून हे प्रोफाईल बनवता येईल. त्यासाठी वापरकर्त्याला स्वत:चा ई-मेल आयडी आणि नाव द्यावं लागेल. वापरकर्त्याला ओळखीसाठी टॅग करण्याचा पर्याय निवडता येईल. मॅसेज प्राप्त करणाऱ्याला हे सर्व मॅसेज त्याच्या इनबॉक्समध्ये दिसतील.


इजिप्त, सौदी अरेबियात लोकप्रिय

तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य होईल की हे अॅप मागच्या काही महिन्यांपासून इजिप्त आणि सौदी अरेबियात धुमाकूळ घालत आहे. देशातही हे अॅप हळूहळू लोकप्रिय होऊ लागलं आहे. खासकरून तरूणांमध्ये या अॅपचं विशेष आकर्षण आहे.



गोपनीयतेकडे विशेष लक्ष

'गोपनीयता' या सुविधेचा अर्थ येथे असा आहे की तुम्ही तुमचं प्रोफाईल या सर्च इंजिनवरून काढून टाकू शकता. त्याचसोबत ज्या व्यक्तींसोबत तुम्ही तुमचं प्रोफाईल शेअर करत आहात, त्यांच्यापुरतंच ते मर्यादीत ठेवू शकता. ओळख नसतानाही तुमच्याशी संपर्क करणाऱ्या व्यक्तीसाठी अॅक्सेस बंद करू शकता.


दुरूपयोग होण्याची शक्यता

नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे येथेही या अॅपचा दुरूपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नावाशिवाय मॅसेज पाठविण्याच्या पर्यायाचा काही व्यक्ती दुरूपयोग करू शकतात.



हे देखील वाचा -

आख्खं गिरगाव आता आलं मोबाईल अॅपवर!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा