व्हॉट्सअॅपमध्ये इंस्टॉल होतय गुप्तचर सॉफ्टवेअर

व्हॉट्सअॅपमध्ये एका सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळं व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या ग्राहकांच्या मोबाईलमध्ये गुप्तचर सॉफ्टवेअर इंस्टॉल होत आहे. स्पायवेयर असं या सॉफ्टवेअरचं नाव आहे.

SHARE

व्हॉट्सअॅपमध्ये एका सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळं व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या ग्राहकांच्या मोबाईलमध्ये गुप्तचर सॉफ्टवेअर इंस्टॉल होत आहे. स्पायवेयर असं या सॉफ्टवेअरचं नाव आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या सॉफ्टवेअरची निर्मिती इसराइली कंपनी एनएसओनं केली आहे.


सतर्क राहण्याचा इशारा

याबाबत फेसबुकनं त्यांच्या व्हॉट्सअॅप युजर्सना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, मोबाइल मॅसेजिंग अॅप अपडेट करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, एकाद्या मोबाइल व्हॉट्सअॅप युजर्सनं व्हॉट्सअॅप कॉल उचलला नाही तर त्यांच्या मोबाईलमध्ये हा सॉफ्टवेअर इंस्टॉल होतो.


युजर्सच्या फोनमधील माहिती

या स्पायवेयर सॉफ्टवेअरच्या मदतीनं अटेकर्स व्हॉट्सअॅप यूजर्सना कॉल करत त्यांच्या मोबाईल फोनमध्ये सॉफ्टवेअर इंस्टॉल करत आहेत. तसंच त्यांच्या फोनमधील माहिती गोळा करत आहेत. दरम्यान, युजर्सना कॉल करणारे अटेकर्स त्यांच्या मोबाईल फोनमधील कॉल डिटेल्स डिलीट करत असल्यानं त्यांची माहिती युजर्सना मिळत नाही.हेही वाचा -

स्किमरच्या माध्यमातून पैसे चोरणारा नायझेरियन अटकेत

टी- २० मुंबई लीगच्या दुसऱ्या सीझनला आजपासून सुरूवातसंबंधित विषय
ताज्या बातम्या