Advertisement

बँक ऑफ महाराष्ट्रची दिवाळी भेट, कर्ज केलं स्वस्त

व्याजदर कमी केल्याने बँकेचे गृहकर्ज, वाहन कर्ज, सोन्यावरील कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि एमएसएमई कर्ज स्वस्त होणार आहे. सणासुदीच्या काळात बँकेने गृह, वाहन आणि गोल्ड लोनवरील प्रोसेसिंग फी देखील न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रची दिवाळी भेट, कर्ज केलं स्वस्त
SHARES

बँक ऑफ महाराष्ट्रने आता ग्राहकांना दिवाळी भेट दिली आहे. बँकेने बँकेने आरएलएलआर- रेपो लिंक्ड लेंडिंग रेट वर आधारित व्याजदरांमध्ये ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे बँकेचा व्याजदर ६.९० टक्क्यांवर आला आहे. याशिवाय बँकेने प्रोसेसिंग फी देखील न आकारण्याची घोषणा केली आहे.

व्याजदर कमी केल्याने बँकेचे गृहकर्ज, वाहन कर्ज, सोन्यावरील कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि एमएसएमई कर्ज स्वस्त होणार आहे. सणासुदीच्या काळात बँकेने गृह, वाहन आणि गोल्ड लोनवरील प्रोसेसिंग फी देखील न घेण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे नवीन व्याजदर ७ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. 

बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, महिलांना अतिरिक्त ०.०५ टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. याशिवाय संरक्षण क्षेत्रात (आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स) काम करणाऱ्यांना देखील अतिरिक्त ०.०५ टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे.

याआधी बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडियाने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ बडोदाचा रेपो रेटवर आधारीत व्याजदर ६.८५ टक्के झाला आहे.  युनियन बँक ऑफ इंडियाने ३० लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या गृहकर्जासाठी ०.१० टक्के कपात केली आहे. 



हेही वाचा -

आता व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसेही पाठवता येणार

जुनी वाहनं कमी करण्यासाठी केंद्राकडून एक्स्चेंज ऑ‌फर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा